Lokmat Sakhi >Beauty > चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

Homemade Curd Face Packs For Different Skin Types : चेहऱ्यावर हळद आणि दही लावल्याने चेहरा चमकदार दिसतो.  दह्याबरोबर आपण कोणते पदार्थ चेहऱ्याला लावू शकतो ते पाहूया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:18 PM2023-09-29T16:18:16+5:302023-09-29T18:03:46+5:30

Homemade Curd Face Packs For Different Skin Types : चेहऱ्यावर हळद आणि दही लावल्याने चेहरा चमकदार दिसतो.  दह्याबरोबर आपण कोणते पदार्थ चेहऱ्याला लावू शकतो ते पाहूया

Curd Facial At Home : Homemade Curd Face Packs For Different Skin Types | चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

(Image Credit-Kudrat Care-You tube)

दिवसभराचा थकवा, ताण-तणाव यांमुळे चेहरा डल किंवा काळा पडतो. दह्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर ग्लो मिळवू शकता. यामुळे त्वचा डागविरहीत आणि सुंदर दिसण्यास मदत होते. यामुळे टॅनिंग आणि डेड सेल्स निघून जातत. दह्यात असे गुण असतात ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते. चेहऱ्यावर हळद आणि दही लावल्याने चेहरा चमकदार दिसतो.  दह्याबरोबर आपण कोणते पदार्थ चेहऱ्याला लावू शकतो ते पाहूया. (Curd Facial At Home)

दही आणि हळद

एका वाटीत दही घ्या त्यात अर्धा चमचा हळद मिसळा.  ही पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायाने चेहऱ्यावर ग्लो येईल. हळदी एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमटरी गुण असतात. ही पेस्ट चेहऱ्यावलल लावल्याने टॅनिंग कमी  होण्यास मदत होईल.

 

गौरी-गणपतीत चेहऱ्यावर तेज हवंय? पार्लरला न जाता घरी करा ४ उपाय, नितळ त्वचा-ग्लोईंग चेहरा

दही आणि मध

मध आणि दही एका वाटीत घ्या. त्यात चमचाभर मध घाला मग २ चमचे दही घाला. हा फेस पॅक चेहऱ्याला १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहऱ्यावर सुदींग इफेक्ट मिळतो. यामुळे त्वचा मऊ-मुलायम होते. 

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचं मिश्रण त्वचेवर पूर्वापार वापरलं जात आहे. हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्याचं टॅनिंग निघून जाण्यास मदत होते. दही आणि बेसनाचा पॅक चेहऱ्याला लावा. २० मिनिटं चेहऱ्याला लावून मग धुवा.  यामुळे चेहऱ्याचा मळ निघून जाण्यास मदत होते. 

कांद्याचे साल फेकून देता? केसांना ‘असे’ लावा कांद्याचे साल-डाय न करता काळे होतील केस

दही आणि टोमॅटो

चेहऱ्यावर दही आणि टोमॅटोचा फेस  पॅक लावू शकता. (Face Pack) उन्हामुळे चेहऱ्यावर आलेलं टॅनिंग काढून टाकण्यासाठी  हा फेस पॅक उत्तम ठरतो. स्किन ग्लोईंग दिसण्यासाठी टोमॅटोचा स्क्रब हा उत्तम पर्याय आहे. दही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणते. यामुळे कोणतेही साईट इफेक्ट्सही जाणवत नाही.  आहारातही  दहयाचा समावेश केल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Web Title: Curd Facial At Home : Homemade Curd Face Packs For Different Skin Types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.