Join us  

पावसाळ्यात चेहेऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी करा दही फेशियल; घरच्याघरी ब्यूटी ट्रीटमेण्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 7:18 PM

दह्यातील गुणधर्माचा त्वचेस (curd for beauty) जास्त फायदा करुन देण्यासाठी दह्याचं फेशियल (curd facial) करण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात.

ठळक मुद्देदह्यात असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी उपयुक्त असतं.दह्यात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.

पचनाशी निगडित अनेक समस्यांवर घरगुती उपाय म्हणून घरी विरजलेल्या दह्याचा वापर केला जातो. पण एरवीच्या तुलनेत पावसाळ्यात दही कमी खाल्लं जातं. दही जपून खाण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. हेच दही खाण्याव्यतिरिक्त सौंदर्योपचारांसाठीही (curd for beauty) वापरता येतं. दह्याचा वापर करुन चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक आणणारं दह्याचं फेशियल (curd facial)  करता येतं.  दह्याचं फेशियल (benefits of curd facial to skin)  करुन त्वचा उजळतेही आणि मऊही होते. 

दह्यात असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी उपयुक्त असतं. चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. दह्यामुळे त्वचा माॅश्चराईज होते आणि त्वचेवर चमकही येते. दह्यात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. दह्यातील या गुणधर्माचा त्वचेस जास्त फायदा करुन देण्यासाठी दह्याचं फेशियल करण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात. 

Image: Google

दह्याचं फेशियल कसं करावं?

1. दह्यानं सर्वात आधी चेहेरा स्वच्छ करावा. दह्यानं चेहेरा स्वच्छ केल्यानं चेहेऱ्यावरील धूळ घाण स्वच्छ होते.  दह्यानं क्लीन्जिंग करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे दही घ्यावं. हाअअत थोडं थोडं दही घेऊन 2- 3 मिनिटं हलक्या हातानं चेहेऱ्यास मसाज करावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

2. दह्यानं स्क्रबिंग केल्यास चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. तसेच चेहेऱ्याच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यासही मदत होते. दह्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. दह्यानं चेहेऱ्याचं स्क्रब करण्यासाठी एका वाटीत 2 चमाचे दही आणी अर्धा चमचा काॅफी पावडर घ्यावी. दोन्ही चांगलं एकत्र करुन या मिश्रणानं 2-3 मिनिटं चेहेऱ्याला हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. यामुळे चेहेरा ताजा तवाना होतो.

 3. दह्यानं चेहेऱ्यास मसाज केल्यास चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक येते. दह्याचा मसाज केल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतोत. दह्याचं मसाज क्रीम करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे दही घ्यावं. त्यात अर्धा चमचा मध आणि थोडं बदामाचं एल घालावं. हे मिश्रण एकजीव करुन चेहेऱ्याला हलक्या हातानं 5- 10 मिनिटं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर ते चेहेऱ्यावर सुकू द्यावं. चेहेरा सुकला की पाण्यांनं चेहेरा धुवावा किंवा ओल्या फडक्यानं पुसून घेतला तरी चालतो. 

Image: Google

4. दह्याचा लेप लावल्यानं त्वचा लहान मुलांसारखी मऊ मुलायम होते. दह्याच्या लेपानं त्वचेचं योग्य पोषणही होतं.  दह्याचा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत 2-3 चमचे दही घ्यावं. त्यात 1 चमचा चंदन पावडर आणि 1 चमचा बेसन घालावं. यात थोडा कोरफडीचा गर किंवा जेल घालावं. हे सर्व जिन्नस एकजीव करुन घेऊन चेहेऱ्यास लावावं. 15-20 मिनिटं ते चेहेऱ्यावर सुकू द्यावं. लेप वाळला की पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा.

5. सर्वात शेवटी चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावावंं. त्वचा कोरडी असल्यास दह्याच्या फेशियल नंतर चेहेऱ्याला कोरफड जेल लावावं.  आणि त्वचा जर तेलकट असेल तर चेहेऱ्यावर गुलाब पाण्याचं टोनर लावावं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी