केस गळणं सध्या खूपच कॉमन झालंय. प्रदूषण, केमिकल्सचा वापर यामुळे केस गळतीची समस्या वाढली आहे. केस काळे आणि दाट होण्यासाठी लोक वेगवेगळ्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात पण यामुळे केसांच्या आरोग्यात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. (How to Apply Curd on Hair) केमिकल्स व्यतिरिक्त काही घरगुती उपायांचा वापर केला तर कोणत्याही खर्चाशिवाय केसांना पोषण मिळेल आणि केस गळणं कमी होईल. (Curd For Hair How to use Curd for Hair ) दही प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतं. दह्याचा वापर केसांवर केल्यास चांगला परीणाम दिसून येईल. (How to use curd for hair growth)
कडुलिंब आणि दही
काही घरगुती पदार्थांममध्ये मिसळून दही केसांवर लावल्यास चांगला परीणाम दिसून येईल. यामुळे तुमचे केस लांब आणि काळे राहतील. कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात दही आणि कडुलिंबाची पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांवर जवळपास ३० मिनिटांसाठी लावलेली राहू द्या. नंतर शिकेकाई साबण किंवा सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. नियमित १ महिना हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम झालेला दिसून येईल.
दही आणि मध
घरात दही असेल तर तुम्ही दही आणि मध मिसळून याची पेस्ट केसांना लावून दाट, लांब केस मिळवू शकता. यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात दही आणि मध घ्या . त्यानंतर याची पेस्ट बनवून केसांना लावा. जवळपास ३० मिनिटांपर्यंत तसेच लावलेले राहू द्या त्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. नियमित हा उपाय केल्यास केस काळे- दाट होण्यास मदत होईल
एलोवेरा आणि दही
एलोवेरा त्वचेप्रमाणे केसांसाठीही तितकाच फायदेशीर ठरतो. हे दोन्ही पदार्थ केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतात. सगळ्यात आधी एका वाटीत दही घ्या त्यात एलोवेरा जेल मिसळा. या दोन्ही पदार्थांची पेस्ट बनवून केसांना लावा आणि नंतर केस स्वच्छ धुवा. या उपायामुळे केसांचा डलनेसस कमी होईल आणि केस काळे-दाट दिसतील.