Join us  

चेहरा चांदीसारखा चमकेल-टॅनही होईल गायब, फक्त दह्यात मिसळून १ रस लावा! पाहा तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 3:38 PM

Curd for Your Face: Skin Benefits, How to Use : कोण म्हणतं दह्यामुळे टॅनिंग जात नाही? एकदा 'या' पद्धतीने याचा वापर करून पाहा..

उन्हाळा सुरु होताच त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते (Curd for Skin). उन्हात बाहेर पडताच स्किन टॅन, चेहऱ्यावर मुरुमांचे डाग, यासह इतर समस्या निर्माण होतात. घराबाहेर पडताना आपण चेहऱ्यावर स्कार्फ, सनस्क्रीन, क्रीम्स लावून बाहेर पडतो. पण तरी देखील चेहरा टॅन होतोच (Skin Care Tips). टॅनिंग घालवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण रसायनयुक्त ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण दह्याच्या वापराने स्किन क्लिन करू शकता.

उन्हाळ्यात दह्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. पण आपण याचा वापर स्किनसाठी देखील करू शकता. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते. ज्यामुळे नवीन पेशी तयार होतात. शिवाय नैसर्गिक ग्लो देखील येतो. पण चेहऱ्यासाठी दह्याचा वापर कसा करावा? पाहा(Curd for Your Face: Skin Benefits, How to Use).

चेहऱ्यावर दही आणि लिंबाचा वापर

- चेहऱ्यावर आपण दही आणि लिंबाचा फेसपॅक तयार करून वापरू शकता. दही आणि लिंबातील पौष्टीक घटक चेहऱ्याला अनेक पौष्टीक गोष्टी प्रदान करतात. यामुळे स्किनच्या अनेक समस्या सुटतात. शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. पण फेसपॅक तयार करण्यासाठी दही आणि लिंबाचा वापर कसा करावा?

केस धुतले की फरशीवर केसच केस? शाम्पूमध्ये मिसळा १ नैसर्गिक जेल; केस होतील घनदाट-करतील शाईन

- सर्वात आधी चेहऱ्याला डीप क्लिन करा. नंतर एका बाऊलमध्ये  २ चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार मिश्रण चेहऱ्याला लावा.  हे मिश्रण त्वचेला चांगले एक्सफोलिएट करते. ज्यामुळे स्किन क्लिन आणि सुंदर डागरहित दिसते. आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

चेहऱ्यावर दही लावण्याचे फायदे

- दही त्वचेला आर्द्रता प्रदान करते. यामुळे चेहऱ्यावरील कोमलता कायम राहते. यातील लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याला मॉइश्चराझ करते. तसेच त्यात फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. या पौष्टीक घटकांमुळे त्वचा निरोगी रहाते.

१० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

- दह्यात आपण मध देखील मिसळून लावू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये थोडे दही घ्या. त्यात मध घालून मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. १५ मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

- दही सनबर्नपासून सरंक्षण करते. अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल