केस स्ट्रेट करण्याची क्रेज सध्या महिलावर्गामध्ये वाढत चालली आहे. प्रत्येकाला सरळ केस आवडतात. स्ट्रेट हेअरमुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. म्हणूनच आता स्मूथिंग टू स्ट्रेटनिंग सारखे उपाय केले जातात. हेअर स्ट्रेटनिंगसाठी पार्लरमध्ये जावे लागते. व यात खर्च देखील जास्त होतो. पण आपण दह्याचा वापर करून देखील हेअर स्ट्रेट करू शकता.
दह्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्याचा फायदा कोंडा नाहीसा करण्यासाठी होतो. ज्यामुळे केस शाईन व बाउंसी देखील होतात. दही केसांसाठी चांगले मानले जाते. म्हणूनच केसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. मशीनविना, महागडे प्रॉडक्ट्सचा वापर न करता आपण घरच्या घरी हेअर स्ट्रेट करू शकता. केस स्ट्रेट करण्यासाठी याचा वापर कसा करता येईल ते पाहूयात(Curd hair mask for straightening).
घरच्या घरी हेअर स्ट्रेट करण्यासाठी उपाय
३ चमचे दही
२ चमचे मध
१ चमचा एलोवेरा जेल
या पद्धतीने बनवा हेअर स्ट्रेटनिंग मास्क
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ३ चमचे दही, २ चमचे मध, आणि १ चमचा एलोवेरा जेल मिसळून मिश्रण तयार करा. मिश्रण तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. ही पेस्ट रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून ती चांगली सेट होईल. अशा प्रकारे हेअर स्ट्रेटनिंगची पेस्ट रेडी.
महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन
केसांवर या पद्धतीने लावा हेअर मास्क
सर्वप्रथम, केस चांगले विंचरून घ्या. आता ही पेस्ट ब्रशच्या मदतीने केसांवर लावा. टाळूपासून ते केसांच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावा. काही वेळा नंतर केस सामान्य पाण्याने धुवा. याच्या वापरामुळे केस स्ट्रेट व शाईन होतील.
केसांना वारंवार मेहेंदी लावता? सतत मेहेंदी लावण्याचे ५ साईड इफेक्ट्स, सावधान..
या हेअरपॅकचे फायदे
केसांमध्ये दही लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळते, जे केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. एलोवेरा जेल लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो. त्यात भरपूर आर्द्रता असते, ज्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केस लांब आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. जर केस निस्तेज असतील तर, मधाचा वापर करा. मधाच्या वापराने केसांना चमक येते.