एकदा केस गळायला सुरूवात झाली की (Hair Fall Solution) केस गळण्याचा त्रास लवकर थांबत नाही. वेगवेगळे उपाय करण्याच्या नादात डोक्यावरचे केस अर्धे होत जातात. म्हणूनच केसांची वेळीच काळजी घेणं महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात कढीपत्ता वापरला जातो. कढीपत्त्या जेवणाला चव आणतो त्याचप्रमाणे सौंदर्याच्या दृष्टीनेही त्याचे अनेक फायदे आहेत. (How To Grow Hairs Faster) कढीपत्ता हा एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असते. केसांना मजबूत बनवण्यासाठी कढीपत्ता (Curry Leaves) व्हिटामीन आणि खनिजे देतो. ज्यामुळे कढीपत्त्याचा वापर केल्यास केसांना भरपूर फायदे मिळतील. (Curry Leaves And Coconut Oil For Hair Fall Control And To Promote Hair Growth Research )
रिसर्च जर्नल फार्माकॉग्नोसी एण्ड फायटोकेमिस्ट्रीच्या रिपोर्टनुसार (Murraya Koenigii) म्हणजेच कढीपत्ता रक्त शुद्ध करणारा एक घटक आहे. यात एंटी ऑक्सिडंट्स, एंटी डायबिटीक गुण असतात. एंटी हायपरटेन्सिव्ह सायटोटॉक्सिक, श्वसननलिकेसंबंधीत श्वसन समस्यांवर उपचार म्हणून याचा वापर केला जातो.(Ref) कढीपत्ता केसांसाठी गुणकारी आहे कारण यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे केस गळणं रोखता येतं. केसांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात. केसांना मजबूत करणारे अमिनो एसिड्सची कढीपत्त्यात असते.
दुधावर भाकरीसारखी जाड साय येईल; 'या' सोप्या टिप्स वापरा, कोणतंही दूध असो भरपूर साय मिळेल
केसांसाठी कढीपत्ता कोणत्या पद्धतीनं वापरावा (How To Use Curry Leaves On Hairs)
केस वाढवण्यासाठी आणि केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्ता (Curry Leaves) आणि नारळाचं तेल (Coconut Oil) तुम्ही केसांना लावू शकता. यासाठी एका मोठ्या कढईत नारळाचं तेल घ्या. त्यात मूठभर ताजे कढीपत्ते घाला. जेव्हा कढीपत्ते तळून होतील तेव्हा गॅस बंद करा. हे तेल थंड करून एका काचेच्या बरणीत भरा. आठवड्यातून १ ते २ वेळा हे तेल तुम्ही केसांना लावू शकता. या तेलाने केसांची मसाज कमीत कमी १ तास करू शकता. ज्यामुळे केस मुळापासून वाढण्यास मदत होते.
कढीपत्त्याने केसांना अनेक फायदे मिळतात. या पानांना केसांवर लावल्याने केसांना चमक येते. केसांना फाटे फुटण्याचा त्रास होत नाही. केसांवर इंफेक्शनचा धोका कमी होतो. स्काल्पला भरपूर पोषण मिळते. डॅमेज केस रिपेअर होतात. केस अकाली पांढरे झाल्यास केस पुन्हा काळे करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो.
केसांवर तुम्ही कढीपत्ता वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता.
कढीपत्ता वाटून यात दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावा. डॅड्रफ दूर होण्यास मदत होते. हेअर मास्कचा चांगला परिणाम दिसून येतो. मेथीची पानं, आवळ्याचा रस आणि कढीपत्ताची पेस्ट एकत्र केसांना लावू शकता. कढीपत्ता केसांना या पद्धतीने लावल्यास स्काल्पला पोषण मिळेल आणि केस वेगाने वाढतील.