केस गळण्याच्या समस्येनं बरेच लोक त्रस्त असतात (Hair Fall Solution). अशात एकदा केस गळायला लागले की पुन्हा नवीन कधी येणार असा प्रश्न पडतो. केसांचं गुच्छे विंचरताना मोठ्या प्रमाणात दिसतात. ज्यामुळे स्काल्पवरील केस दिवसेंदिवस कमी दिसू लागतात. केमिकल्सयुक्त उत्पादनांमुळे ही समस्या अधिक वाढते. स्वंयपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या कढीपत्त्याचा वापर करून तुम्ही लांबसडक-दाट केस मिळवू शकता (How To Get Long Hairs Using Curry Leaves).
ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळणंही कमी होईल.कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. स्काल्पचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे घटक आवश्यक असतात. कढीपत्त्यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस असते ज्यामुळे केसांचे ओव्हरऑल आरोग्य चांगले राहते. (Curry Leaves And Coconut Oil For Hair Fall Control)
केसांसाठी कढीपत्त्याचं तेल कसं बनवायचं? (How To Make Curry Leaves Hair Oil)
केस गळणं थांबवण्यासाठी कढीपत्ता, नारळाचं तेल आणि मेथीचे दाणे मिसळून तेल बनवा. हे तेल एका वाटीत काढून त्यात नारळाचं तेल आणि १ चमचा मेथीचे दाणे मिसळा त्यात मूठभर कढीपत्ता घाला नंतर हे तेल गरम करून घ्या नंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका बरणीत भरून ठेवा.
पाय काळवंडले? फक्त १ रूपयांच्या शॅम्पूनं दूर करा पायांचा काळेपणा; सुंदर-उजळ दिसतील पाय
कढीपत्त्याचं तेल डोक्याला लावल्यानं केस गळण्याची समस्या कमी होईल हे तेल केसांना लावून व्यवस्थित चंपी करा. एक तास डोक्यावर तेल लावून ठेवल्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.
केसांवर तुम्ही कढीपत्त्याचा हेअर मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी मूठभर कढीपत्ता वाटून घ्या. नंतर यात ३ ते ४ चमचे दही मिसळून व्यवस्थित एकत्र करा. तयार हेअर मास्क केसांवर लावून अर्धा तास तसंच ठेवा नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केस चांगले राहतील आणि मऊ-मुलायम बनतील. केस गळणं कमी होईल आणि केस चमकदार होतील.