जेवणात चटणी असली की पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. ताटात चटणी असली की, आपण एक पोळी एक्स्ट्रा खातो, शिवाय चटणीमुळे जिभेला नवीन चव मिळते ते वेगळंच (Curry Leaves Chutney). पण चटणीचा फायदा आरोग्याला होतो का? महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या चटणी केले जातात. पण काही चटणी चवीला तर काही चटणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. खोबऱ्याची, तिळाची त्याचप्रमाणे कढीपत्त्याची चटणी आरोग्यासहित केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. फोडणीमध्ये आपण कढीपत्त्याचा वापर करतोच (Hair and Skin Health).
यात कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे गुणधर्म असतात (Cooking Tips). ज्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. पण केस आणि त्वचेसाठी कढीपत्त्याचा वापर कसा करावा? कढीपत्ता आवडत नसेल तर, त्याची चटणी कशी तयार करायची? पाहा(Curry leaves chutney for Hair and Skin health).
केस आणि त्वचेसाठी खास करा कढीपत्त्याची चटणी
तेल
जिरं
काळे डाग-डार्क सर्कलमुळे त्रस्त? दह्यात मिसळा २ गोष्टी; दिसाल सुंदर-काळी वर्तुळे झटक्यात गायब
लसूण
तीळ
अळशीच्या बिया
काश्मिरी लाल सुक्या मिरच्या
सुकं खोबरं
शेंगदाणे
हळद
मीठ
कढीपत्ता
कृती
सर्वप्रथम, एका कढईमध्ये एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, एक छोटा बाऊल तीळ आणि एक बाऊल अळशीच्या बिया घालून भाजून घ्या. नंतर त्यात ५ ते ६ काश्मिरी लाल सुक्या मिरच्या, एक वाटी किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, चिमुटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून भाजून घ्या.
सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात एक मोठा बाऊल कढीपत्त्याची फ्रेश पानं घालून भाजून घ्या. कढीपत्ता कुरकुरीत भाजून घेतल्यानंतर भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व पाणी न घालता कोरडीच वाटून घ्या. अशा प्रकारे बहुगुणी कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी.
कढीपत्त्याची चटणी खाण्याचे फायदे
कढीपत्ता
कढीपत्त्यात असंख्य गुणधर्म असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल, हृदयरोग, लठ्ठपणा, ब्लड शुगर यासह इतर गंभीर आजारांसाठी फायदेशीर ठरते. यासह त्वचा टवटवीत आणि केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत करते.
ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट
अळशीच्या बिया
अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि फायबरयुक्त अळशी आरोग्यासह केसांसाठीही उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने केस अधिक मजबूत आणि घनदाट होतात.
नारळ
केस आणि त्वचेसाठी आपण खोबऱ्याचे तेल वापरतोच. खोबरेल तेलातील आरोग्यदायी गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देते. शिवाय नितळ त्वचेसाठी फायदेशीर ठरते. सुकं खोबरं खाल्ल्याने शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणत मिळते. ज्याचा फायदा आरोग्याला देखील होतो.