केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो (Hair Care Tips). कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. (Control Hair Fall Control Tips) कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात. (Curry Leaves Chutney For Hair Fall Control)
न्युट्रिशनिस्ट सिमरन कथुरिया यांनी केस वाढवण्याासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते याबाबत सांगितले आहे. न्युट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार क्रॅश डाएट किंवा खाण्यापिण्यात पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. कढीपत्त्याची चटणी तुम्ही खास पद्धतीनं बनवू शकता. ज्यामुळे शरीरालाही पोषण मिळेल.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते
क्लिनिकली.कॉमच्या रिपोर्टनुसार कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, बी, सी, ई व्हिटामीन्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्त्यातील व्हिटामीन सी, कोलाजन प्रोडक्शन वाढवते. ज्यामुळे केस सरळ राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचे डॅमेज रोखता येते. कढीपत्त्याच्या सेवनानं केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. ज्यामुळे स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो आणि नवीन केसांची वाढ होते.
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याची ४ ते ५ पानं घ्यावी लागतील. त्याव्यतिरिक्त २ चमचे तूप, एक चमचा चणा डाळ, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, ५ ते ६ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे मोहोरीच दाणे, २ चमचे जीरं आणि गरजेनुसार मिठाची आवश्यकता असेल. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.
नंतर यात चण्याची डाळ घाला मग मोहोरीचे दाणे, मिरची घालून शिजवा. नंतर सर्व मसाले घालून तसंच कढीपत्त्याची पानं ब्लेडरमध्ये घालून पावडर बनवून घ्या. आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा दह्यात मिसळून खाऊ शकता. केसांबरोबरच आरोग्यालाही याचे फायदे मिळतात. ही चटणी खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होते.