Join us  

केस गळतीमुळे टक्कल पडतंय? १० रूपयांचा कढीपत्ता या पद्धतीने केसांना लावा, घनदाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:54 PM

Curry Leaves For Hair Growth : केस वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर कसा करायचा ते समजून घेऊया.

कढीपत्त्याला (Curry Leaves) कढीपत्ता रोजच्या स्वंयपाकात लागणारा एक महत्वाचा पदार्थ आहे. कढीपत्त्याच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास दूर होण्यास मदत होत. अनेकजण कढीपत्ता जेवणाच्या ताटातून बाहेर काढून फेकतात पण  त्वचा आणि केसांना चमकवण्यासाठी कढीपत्ता गुणकारी ठरतो. कढीपत्त्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. कढीपत्त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करू शकता. (How to Use Curry Leaves For Hair Growth Hair Care Tips)

यात विटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे स्काल्पला पोषण मिळते. यात व्हिटामीन्स मिनलरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्काल्प निरोगी राहतो. केस वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर कसा करायचा ते समजून घेऊया. (How To Use Curry Leaves For Hair Growth)

हाडांना कमजोर करते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; ४ पदार्थ खा, शरीर पोलादी बनेल-भरपूर व्हिटामीन मिळेल

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार कढीपत्ता आणि नारळाचे तेल केसांना लावल्यास  एक उत्तम हेअर टॉनिक तयार होते. केसांवर हे टॉनिक अप्लाय केल्यास केसांची वाढसुद्धा चांगली होते. (Ref) कढीपत्त्याचा वापर केसांवर केल्याने केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. याशिवाय केस लांबलचक देखील वाढतात. 

कढीपत्ता आणि एलावेरा (Curry Leaves Alovera)

केसांची लांबी वाढवण्याासठी तुम्ही कढीपत्ता आणि एलोवेराचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा ताजा एलोवेरा जेल घ्या. यात ७ ते ८ कढीपत्ता वाटून घ्या.   दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही पेस्ट आपल्या स्काल्पला आणि केसांना लावा. जवळपास १ तास केसांना लावून ठेवा चांगल्या परिणामांसाठी २ ते ३ वेळा वापरा.

कढीपत्ता आणि दही (Curry Leaves And Curd)

हा हेअर मास्क तयार करण्यासाठी अर्धा कप कढीपत्ता वाटून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट अर्धा कप दह्यात मिसळून घ्या. नंतर ही पेस्ट आपल्या स्काल्प आणि केसांना लावा. जवळपास ४५ मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूने केस  धुवून घ्या. नंतर आठवड्यातून एक ते दोन वेळा याचा  वापर करा. ज्यामुळे केसांची लांबी आणि चमक दोन्ही वाढते.

कढीपत्ता आणि मोहोरीचं तेल (Curry Leaves And Mustard Oil)

केसांना लांब करण्यासाठी तुम्ही कढीपत्ता मोहोरीच्या तेलात मिसळून लावू शकता. यासाठी एका पॅनमध्ये मोहोरीचं तेल घ्या. ७ ते ८ तासांसाठी पानं  घालून उकळवून घ्या नंतर हे तेल थंड करा. शॅम्पू लावल्यानंतर १ ते २ तासांनी आपल्या  स्काल्प आणि केसांना लावून मसाज करा. त्यानंतर रात्रभर केसांना लावून सोडू शकता. नंतर कोणत्याही माईल्ड शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा याचा वापर करा. ज्यामुळे केस लांब-दाट होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी