Lokmat Sakhi >Beauty > ५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस 

५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस 

Curry Leaves for Hair Health (Kes Vadhnvyasathi kadipatta kasa vaprava) : कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:10 AM2023-11-18T11:10:05+5:302023-11-18T11:47:00+5:30

Curry Leaves for Hair Health (Kes Vadhnvyasathi kadipatta kasa vaprava) : कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो.

Curry Leaves for Hair Health : Use Curry Leaves in Just Five Rupees For Long Hair Growth | ५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस 

५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस 

आपले केस लांबसडक, दाट दिसावेत असं प्रत्येकाला वाटते. (Hair Groeth Tips) आजकाल खाण्यापिण्यातील चुका, प्रदूषण, खराब जीवनशैली, ताण-तणाव आणि चुकीच्या उत्पादनांच्या वापरामुळे केस फारच गळतात. (Beauty Tips) केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात  याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. केस वाढत नसतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. (Simple Ways to Use Curry Leves For Voluminous Hair)

केस वाढवण्याासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कढीपत्त्याचा वापर करू शकता. कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो. (Kadipatta Kesana Fayde in Marathi)  यात व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, प्रोटीन आणि एंटीऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. यामुळे केस वाढवण्यास मदत होते. (Brilliant Ways To Use Curry Leves For Healthy And Long Hairs) केसांना कढीपत्ता लावल्यास केस गळणं कमी होऊन केस दाट, चमकदार बनतात. केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर ३ प्रकारे करू शकता. (Use Curry Leaves in Just Five Rupees For Long Hair Growth)

कढीपत्ता-आवळा

केसांना लांबसडक बनवण्यासाठी तुम्ही कढीपत्ता आणि आवळ्याचा हेअर मास्क लावू शकता. यासाठी एक आवळा मिक्सरमध्ये  वाटून घ्या त्यात १ चमचा कढीपत्त्याची पेस्ट मिसळा नंतर ही पेस्ट आपल्या केसांवर लावा जवळपास १ तासासाठी असंच राहू द्या नंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा.  आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावा यामुळे केस  लांब आणि दाट होतील.

मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

कढीपत्ता आणि नारळाचे तेल

केसांच्या वाढीसाठी  तुम्ही कढीपत्ता नारळाच्या तेलात मिसळून लावू शकता.  यासाठी एका पॅनमध्ये नारळाचे तेल घ्या त्यात ७ ते ८ कढीपत्ता घालून उकळून घ्या. त्यानंतर मिश्रण थंड करून घ्या आणि स्काल्प आणि केसांना लावून मसाज करा. जवळपास १ तासाने केस माईल्ड शॅम्पूने स्वच्छ धुवा.

नारळाची सालं टाकून देता? थांबा, ५ भन्नाट फायदे, पिकलेले केस होतील काळे-दात दिसतील पांढरे

कढीपत्ता आणि मेथी

केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता आणि मेथीचा वापर करू शकता. यासाठी  १० ते २० कढीपत्त्याची पानं घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्या. यात २ चमचे मेथीची पावडर मिसळा त्यानंतर केसांना लावा. जवळपास ३० मिनिटं तसंच ठेवल्यानंतर  केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केस लवकरच लांब आणि दाट होण्यास मदत होईल.

Web Title: Curry Leaves for Hair Health : Use Curry Leaves in Just Five Rupees For Long Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.