Join us  

केसांची वाढ थांबणारच नाही, फक्त खोबरेल तेलात 'हिरवे पान' उकळवून लावा; केसांच्या समस्या छूमंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 3:49 PM

curry leaves hair oil recipe | curry leaves for hair : केसांसाठी खोबरेल तेल म्हणजे वरदान; हेअर ग्रोथसाठी याचा वापर नेमका कसा करावा?

केस गळती सुरु झाली की अनेकदा थांबतचं नाही आणि केसांची वाढही खुंटते (Hair care Tips). केस गळणे रोखण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो (Curry leaves). ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो (Coconut Oil). ज्याचा फायदा काही लोकांना होतो, काहींचे अधिक प्रमाणात केस गळतात, यासह केसांच्या समस्याही वाढतात.

जर केसांवर अनेक उपाय फेल झाले असतील तर, खोबरेल तेलात कडीपत्ता उकळवून केसांना लावा. नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड भरपूर असते. लॉरिक ऍसिड हा एक प्रकारचा सॅच्युरेटेड फॅट आहे, ज्यामुळे केसांना पुरेपूर प्रोटीन मिळते. शिवाय स्काल्पला देखील आद्रता प्रदान करते. ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. केसांवर खोबरेल तेलाचा नक्की वापर कसा करावा? पाहा(curry leaves hair oil recipe | curry leaves for hair).

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

दाट केसांसाठी खोबरेल तेल आणि कडीपत्त्याचा वापर

खोबरेल तेल आणि कडीपत्ता केसांसाठी फायदेशीर ठरते. कडीपत्त्यात अँटी-ऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन असतात. जे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

केसांना याचा फायदा व्हावा यासाठी, एका बाऊलमध्ये केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात कडीपत्त्याची पानं घाला. तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेलाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तेल गाळून घ्या, आणि स्काल्पवर लावून मसाज करा.

खोबरेल तेल स्काल्पला आद्रता प्रदान करते. यामुळे कोंडा दूर होतो. ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. यामुळे केस गळणे थांबते, केसांची योग्य वाढ होते, यासह केस दाट होतात.

केसांना यातून पोषण मिळावे म्हणून आपण खोबरेल तेलात कडीपत्त्यासोबत मेथी दाणेही घालू शकता. मेथी दाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन सी हे स्काल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात. यासह मेथी दाण्यात असणारे आयर्न रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी