Join us  

केसांना वाढच नाही-नुसते गळतात? फक्त १० रुपयांत हे घरगुती तेल केसांना लावा, घनदाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 8:39 AM

Curry Leaves Oil For Hairs : कढीपत्त्याचे तेल तयार करण्यासाठी मूठभर कढीपत्ते एक कप नारळाच्या तेलात घालून शिजवून घ्या.

केस गळण्याची  समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना उद्भवते. (Hair Care Tips) महिलो असो किंवा पुरूष प्रत्येकालाच या समस्येतून जावं लागतं. केमिकल्सयुक्त क्रिम, तेल लोक घेऊन येतात त्यामुळे केस गळणं सुरू होतं. (Hair Fall Control Tips) रोजच्या वापरातल्या काही पानांचा वापर रोज केसांवर केला तर केसांचे आरोग्य  चांगले राहील.  जेवणाला फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यामुळे केसांना बरेच फायदे मिळतात. (Curry Leaves) कढीपत्त्याने केसांना कोणते फायदे मिळतात आणि कोणत्या पद्धतीने केसांना लावता येतो ते समजून घेऊया. (Homemade Curry leaves Hair Oil For Hair Growth)

केसांसाठी कढीपत्त्याचे तेल

कढीपत्ता एंटी ऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत आहे. यात अमिनो एसिड असते. या पानांच्या तेलाने हेअर फॉलिक्सना फायदा मिळतो आणि हेअर ग्रोथ होण्यास मदत होते. कढीपत्ताच्या तेलाने केसांची मसाज केल्याने केस वाढण्यास  मदत होते. वेळेआधीच केस पांढरे होत नाही आणि अकाली केस गळणं थांबवता येतं. 

शाळेतून आल्यानंतर मुलांना ५ प्रश्न विचारा; हूशार होतील मुलं-मन लावून अभ्यास करतील

कढीपत्त्याचे तेल तयार करण्यासाठी मूठभर कढीपत्ते एक कप नारळाच्या तेलात घालून शिजवून घ्या. हे तेल शिजवून नंतर कढीपता आचेवरून उतरवून घ्या. नंतर या तेलाने मालिश करू शकता. कढीपत्त्याचे तेल केसांना 2 ते 3 वेळा लावू शकता. कढीपत्त्याचे तेल तयार करताना तुम्ही त्यात मेथीचे दाणे घालू शकता. ज्यामुळे तेलाची गुणवत्ता चांगली राहते.

कढीपत्त्याचा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. कढीपत्त्याच्या हेअर मास्क तयार करण्यासाठी एक कप दह्यात वाटलेला कडीपत्ता घालून मास्क तयार करा. हा हेअर मास्क केसांच्या मुळांना 20 ते 25 मिनिटं लावून ठेवा नंतर केस धुवून घ्या. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केसातील डॅड्रफ काढून टाकण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात.

पाठ-कंबर खूप दुखते, थकवा येतो? रोज या ४ पैकी एका भाजीचा ज्यूस प्या, दुप्पट ताकद येईल

केसांमध्ये तुम्ही कढीपत्त्याचे टोनर बनवून लावू शकता. हे टोनर तयार करण्यासाठी कढीपत्त्याची पानं पाण्यात घालून उकळवून घ्या. नंतर पाणी गाळून थंड करून घ्या. तयार आहे कढीपत्त्याचे टोनर, हे टोनर वापरून तुम्ही केस धुवू शकता नंतर टोनरने केसांवर स्प्रे करा त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स