अनंत चतुर्दशीनंतर सणासुदीला सुरुवात होते (Makeup Tips). आता नवरात्रीला सुरुवात झाली (Navratri 2024). नऊ दिनानिमित्त आपण गरबा - दांडिया खेळतो (Garba Ready). विविध प्रकारचे घागरा - चोली घालून छान तयार होऊन दांडिया खेळायला जातो. पण काही वेळानंतर मेकअप उतरता. शिवाय काळपटही दिसू लागतो.
बऱ्याचदा टॅनिंगमुळेही मेकअप चेहऱ्यावर टिकत नाही. शिवाय चेहरा लवकर काळपटही पडतो. जर नवरात्रीत आपल्याला सुंदर आणि उठून दिसायचं असेल तर, काही टिप्स लक्षात ठेवा. याची माहिती मेकअप आर्टिस्ट शहनाज हुसैन यांनी दिली आहे. नवरात्रीत दांडिया खेळण्यापूर्वी नक्की कसं मेकअप करायचं? पाहा(Dandiya/Garba Ready - Sweat-Proof Makeup Tips).
- मेकअप करण्यापूर्वी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर टॉवेलने त्वचा पुसून लिक्विड मॉइश्चरायझर लावा.
- चेहऱ्यावर थेट फाउंडेशन लावू नका. आधी चेहऱ्यावरचे डाग कन्सीलरने कव्हर करा.
- फाउंडेशन निवडताना तुमच्या त्वचेच्या टोनची विशेष काळजी घ्या. तुमच्या स्किन टोनपेक्षा एक शेड हलका फाउंडेशन खरेदी करा. विशेष प्रसंगी तुम्ही गोल्ड फाउंडेशन देखील वापरू शकता.
कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय
- नाईट मेकअपसाठी गोल्डन टिंटेड पावडरसह गोल्डन फाउंडेशन हा उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे चेहऱ्यावर गोल्डन ग्लो येईल.
- फाउंडेशन लावण्यासाठी हलके ओलसर स्पंज वापरा आणि चेहऱ्यावर समान रीतीने पसरवा. आपण फाउंडेशन मानेवरही लावू शकता.
- फाउंडेशन लावल्यानंतर ब्लश लावा. ब्लशमुळे चेहऱ्यावर छान ग्लो येईल आणि गाल छान हायलाइट होतात.
- लिप मेकअपमध्ये लिप लाइनर वापरणे टाळा आणि फक्त लिपस्टिकने ओठ हायलाइट करा.
- गुलाबी आणि लाल रंगाची लिपस्टिक सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये चांगली दिसते.
- डोळ्यांसाठी ब्राऊन, कॉपर आणि गोल्ड आयशॅडो वापरा.
- आपण आयलाईनर आणि मस्काराही लावू शकता. यामुळे डोळे टपोरे दिसतील.