Join us  

केसात कोंडा झालाय? ग्रीन टी लावा कोंडा गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 3:38 PM

ग्रीन टी फिटनेससाठी पितातच, पण केसांचं आरोग्य उत्तम राखायचं असेल तर त्यांनाही जरा ग्रीन टी द्याच!

ठळक मुद्देकेसांसाठी म्हणून  ग्रीन टी घ्यायचा असेल तेव्हा तो उत्तम प्रतीचाच असायला हवा.

निर्मला शेट्टी

आपल्या फिटनेसविषयी जागरूक असलेले सर्वच जण ‘ग्रीन टी’चं महत्त्व पूरेपूर जाणून आहे.  वजन कमी करणारे तर ग्रीन टीचे मोठे चाहते. ग्रीन टीमधील उपयुक्त आणि आरोग्यदायी घटकांमुळे एक कप ग्रीन टी रोज घेतल्यास शरीराल अनेक फायदे मिळतात. मात्र ग्रीन टीचा आपल्या सौंदर्याशी संबंध आहे, हे सांगितलं तर! कॅमेलिआ सिनेसीस या पानांपासून ग्रीन टी बनवला जातो. ग्रीन टी मध्ये अॅण्टिऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असतात.ग्रीन टी मध्ये पॉलिफेनॉल्स जास्त प्रमाणात असतात. या पॉलिफेनॉल्समुळे कॅलरीज जाळणारे विकर कार्यान्वित होतात. आणि हेच कारण आहे की ग्रीन टी हा उत्तम ‘फॅट बर्नर’ ठरतो. पण म्हणून फिट राहण्यासाठी फक्त ग्रीन टी प्यायला तरी चालतो हा समज मात्र चुकीचा आहे. ग्रीन टी बरोबर संतुलित आहार आणि पुरेसा व्यायामही हवाचं. या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे अपेक्षित वेटलॉस होतो.ग्रीन टी चा उपयोग हा फक्त वजन कमी करण्यासाठीच होतो असं नाही तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही होतो. ग्रीन टीच्या नियमित सेवनानं त्वचेवरची छिद्र भरून येतात. या छिद्रातून कमी तेल झिरपतं. ज्यामुळे त्वचा मऊसूत दिसते. ग्रीन टी मुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

ग्रीन टीचा उपयोग कोंडा आणि स्काल्प सोयरासिस सारख्या समस्या सोडवतानाही होतो. फक्त इथे ग्रीन टी नुसता पिऊन उपयोगाचा नसतो तर तो लेपस्वरूपात केसांना लावायला हवा. यामुळे केसांची ताकद आणि चमकदारपणा वाढतो.केसांसाठी म्हणून  ग्रीन टी घ्यायचा असेल तेव्हा तो उत्तम प्रतीचाच असायला हवा.

 

ब्राह्मी, कडुनिंब आणि ग्रीन टी

केसातला कोंडा जाण्यासाठी एक कप बाह्मी वनस्पतीची पानं, एक मूठभर कडूनिंबाची पानं, एक कप किसलेलं खोबरं, चार चमचे ग्रीन टी आणि दोन थेंब रोजमेरीच्या तेलाचे थेंब घ्यावे. रोजमेरीचं तेल सोडून बाकी सर्व साहित्य अर्धा कप पाण्यात मिक्सरमधून वाटावं. वाटून तयार झालेला रस गाळणीनं गाळून घ्यावा. अर्धा कप मोहरीचं तेल घ्यावं. ते थोडं गरम करावं. त्यात रोजमेरी तेलाचे दोन थेंब टाकावे. या तेलानं टाळूची पाच मिनिटं मालिश करावी. नंतर गाळून ठेवलेला रस टाळूला लावावा. मालिश करत हा रस लावावा. पंधरा मीनिटं हा रस सुकु द्यावा. नंतर सौम्य हर्बल शाम्पूनं केस धुवावे. कंडीशनर म्हणून कोरफडीचा गर लावावा.केसातल्या कोंड्यासाठी म्हणून हा उपाय करताना जोपर्यंत कोंडा पूर्णपणे  जात नाही तोपर्यंत आठवड्यातून एकदा हा ‘ग्रीन टी’चा उपाय करायलाच हवा.

(लेखिका सौंदर्यतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स