Join us  

केसात प्रचंड कोंडा झालाय, टाळूला खाज सुटते? १ लिंबू आणि ३ उपाय, कोंड्यावर उत्तम औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 2:05 PM

Dandruff Itchy Scalp Home Remedy हिवाळ्यात टाळूवरील त्वचा कोरडी पडते, ज्यामुळे केस निर्जीव आणि कोंडा वाढतो. लिंबूचा वापर केल्याने यापासून सुटका मिळेल..

हिवाळ्यात आपल्याला एकच गोष्ट प्रचंड आवडते ती म्हणजे गुलाबी थंडी. मात्र, या थंडीच्या मौसमात त्वचा कोरडी आणि केसांच्या समस्या उद्भवतात. केसांमध्ये कोंडा, केस गळणे, केस निर्जीव दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. डोक्यावरील त्वचा कोरडी होऊ लागते आणि ओलसरपणा कमी होऊन जातो. या कारणामुळे टाळूवर कोंडा बऱ्याप्रमाणात जमतो. कोंडामुळे डोक्यावर खूप खाज सुटते. त्यामुळे केस लवकर गळतात. अशावेळी आपण लिंबूचा वापर करू शकता. लिंबूचा वापर केल्याने केसांमधील कोंडा दूर होतो.

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. परंतु अनेक वेळा माहितीच्या अभावी लोक लिंबाचा रस थेट डोक्यावर लावतात, जे खूप हानिकारक आहे, त्यामुळे डोक्यावरील त्वचा खराब होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत लिंबाचा रस कसा लावायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पाण्यासह लिंबाचा रस

जर तुमच्या डोक्यात कोंडा झाला असेल, आणि तुम्ही यामुळे त्रस्त असाल तर लिंबाचा रस उपयुक्त ठरेल. एका भांड्यात एका लिंबाचा रस घ्या आणि त्यात एक कप पाणी घाला. हे मिश्रण तयार झाल्यानंतर पहिले शैम्पूने केस धुवा. केस धुतल्यानंतर लिंबू पाण्याने टाळू चांगले धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करून पहा. यामुळे तुमची कोंड्याची समस्या काही दिवसात दूर होईल.

कोरफड जेल आणि लिंबाचा रस

कोरफडीचा गर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस दाट आणि मुलायम बनवण्यासोबतच कोंडाही दूर होतो. यासाठी एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. आता दोन्ही चांगले मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये चांगले लावा. अर्ध्या तासानंतर डोके धुवा. असे केल्याने उत्तम रिझल्ट मिळेल.

खोबरेल तेल आणि लिंबू

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलात लिंबाचा रस चांगला मिसळा आणि रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावा. सकाळी सौम्य शैम्पूने आपले डोके धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केसांमधून कोंडा हळूहळू दूर होईल.

टॅग्स :केसांची काळजीत्वचेची काळजीहोम रेमेडी