Join us

कोंडा आणि कोरड्या केसांमुळे हैराण झालात? ‘या’ ४ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होतोय त्रास, काय उपयोग तेल-शाम्पूचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 13:58 IST

Dandruff Causes and Remedies: Hair Loss Due to Vitamin Deficiency: How to Treat Dry Scalp Naturally: Best Vitamins for Healthy Hair Growth: Itchy Scalp Treatment for Dandruff: Dry Skin and Dandruff Connection: Top Home Remedies for Dandruff: Vitamin Deficiency Symptoms and Hair Loss: Itchy Skin and Scalp Solutions: How to Prevent Hair Loss from Dry Scalp: Vitamin Deficiency and Dry Skin: Best Shampoos for Dandruff and Hair Loss: आपल्या शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यानंतर कोंडा होऊ शकतो किंवा केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

केसगळती, केस कोरडे होणे आणि केसात कोंडा होणे या समस्येमुळे हल्ली अनेकजण त्रस्त आहेत.(Dandruff Causes and Remedies) महागडे उत्पादने, केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करुन देखील केसातील कोंडा काही कमी होत नाही. अनेकदा आपण केसांसाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करतो. ( Hair Loss Due to Vitamin Deficiency) काहीवेळा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट देखील घेतो. कोड्यांच्या या समस्यांमुळे आपल्या टाळूवर पांढरा थर जमा होऊन खाज सुटू लागते.( How to Treat Dry Scalp Naturally) ही समस्या टाळू कोरडी पडणे, घाणीमुळे आणि त्वचेच्या आजारामुळे होते असे अनेकांना वाटते. (Best Vitamins for Healthy Hair Growth)आपल्या शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यानंतर कोंडा होऊ शकतो किंवा केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.(Itchy Skin and Scalp Solution) व्हिटॅमिन बी २, बी३, बी ६, बी९ ची शरीरात कमतरता असेल तर त्याचा केसांच्या आरोग्यावर खोलवर परिणाम करते. ही जीवनसत्त्व केसांच्या वाढीस चालना देतात, तसेच टाळू निरोगी ठेवतात.( How to Prevent Hair Loss from Dry Scalp) यामुळे केसातील कोंडा देखील कमी होतो. जाणून घेऊया आहारात कोणते पदार्थ असायला हवे. 

उन्हाळ्यात घामामुळे त्वचा लाल-रॅशेस- पुरळ येतात, सतत खाज सुटते? ५ घरगुती उपाय, त्रास होईल कमी

1. जीवनसत्त्व बी २ 

जीवनसत्त्व बी २ ला रिबोफ्लेविन असेही म्हटले जाते. केस आणि त्वचेसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे टाळूला खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोरडेपणाच्या समस्या वाढतात, ज्यामुळे कोंडा होतोत. रिबोफ्लेविनमुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारून त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात दूध, अंडी, हिरव्या भाज्या आणि काजू खायला हवे. 

2. जीवनसत्त्व बी ३ 

जीवनसत्त्व बी ३ ला नियासिन असे म्हणतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहाते. याची कमतरता झाल्यास टाळूला सूज येणे, खाज सुटणे यांसारख्या समस्या होऊन केसात कोंडा होतो. हे जीवनसत्त्व टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करते. डोक्यातील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी आपण आहारात मासे, चिकन, कडधान्ये खायला हवे. 

कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण

3. जीवनसत्त्व बी ६ 

जीवनसत्त्व बी ६ केसांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हे केसाची मुळे मजबूत करुन टाळूची जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करते. जर जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टाळूला सूज येऊ शकते.ही कमतरता भरुन काढण्यासाठी मासे, शेंगदाणे, सोयाबीन, गहू, ओट्स, केळी, बटाटे आणि पालक खाऊ शकता. 

4. जीवनसत्त्व बी ९ 

यामध्ये फॉलिक ॲसिड असते. याची कमतरता झाल्यावर टाळूच्या त्वचेवर जळजळ, कोरडेपणा आणि खाज येते. ज्यामुळे केसातील कोंडा अधिक वाढतो. फॉलिक ॲसिड केसांना आणि त्यांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करते. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि संत्री नियमित खायला हवी.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी