आपण आपल्या त्वचेची, चेहऱ्याची अनेकप्रकारे काळजी घेतो. परंतु शक्यतो आपले पायांकडे खूप वेळा दुर्लक्ष होते. खरतरं, चेहऱ्याच्या त्वचे इतकीच हातापायांच्या त्वचेची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. पायांच्या त्वचेकडे लक्ष न दिल्यामुळे काही दिवसांनंतर पायांची त्वचा हळूहळू खराब होऊ लागते. आपले पाय सतत धूळ, माती, चिखल यांचा संपर्कात असतात. तसेच बरेचदा सूर्यप्रकाशामुळे देखील आपले पाय काळवंडले जाऊन त्यांचा मूळ रंग बदलतो. एवढेच नव्हे तर बरेचजणांच्या पायांच्या घोटाजवळची स्किन ही खूपच काळवंडलेली आणि सुरकुतलेली रुक्ष असते. आपण अनेकदा पाहिले असेल की, आपल्या पायांच्या घोटाजवळची स्किन ही काळी पडलेली असते(How to remove darkness on ankle).
घोट्यांचा काळपटपणा वाढल्यानंतर तो आजूबाजूला देखील पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे पायांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. संपूर्ण पायांचा रंग वेगळा आणि घोट्यांचा रंग वेगळा यामुळे आपल्या पायांचे सौंदर्य खराब होते. पायांचे घोटे काळवंडल्याने अनेकदा चारचौघात लाजिरवाणे वाटते. काळवंडलेल्या पायांची टॅनिंग ( How To Get Rid Of Dark Ankles) तसेच घोट्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी बऱ्याचजणी ब्यूटी पार्लरमध्ये जातात. पण पार्लरमध्ये जाऊन स्किनवर केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण, घरगुती उपायांनी देखील स्किन क्लिन करू शकतो. बऱ्याचदा केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्समुळे स्किन खराब होते. जर पायांच्या घोट्यांचा काळपटपणा दूर करुन तिथली त्वचा मऊ, मुलायम करायची असेल तर या घरगुती उपायाचा नक्की वापर करून पाहा( How do you get rid of black dead skin on your ankles).
साहित्य :-
१. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून २. टूथपेस्ट - १/२ टेबलस्पून ३. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून ४. दूध - १ टेबलस्पून
सतत केस गळून विरळ झालेत ? टक्कल दिसतंय? 'या' ४ तेलांचे मिश्रण करेल जादू, केसांची होईल वाढ...
विरळ झालेल्या आयब्रो जाड-भरीव करण्याचा खास उपाय-पाहा आयब्रो टिटिंगचा नवा ट्रेण्ड...
कृती :-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ घेऊन त्यात टूथपेस्ट, बेकिंग सोडा, दूध घालून हे सगळे जिन्नस चमच्याने एकत्रित हलवून घ्यावे. हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करून त्याची पातळ पेस्ट तयार करून घ्यावी.
या पेस्टचा वापर कसा करावा ?
आता ही तयार पेस्ट काळवंडलेल्या पायांच्या घोट्यांना लावावी. ही पेस्ट लावल्यांनंतर ५ मिनिटे बोटांनी घोट्यांवर हलकेच मसाज करुन घ्यावा. १० ते १५ मिनिटे ही पेस्ट तशीच लावून ठेवावी. त्यानंतर ओल्या स्पंजच्या मदतीने ही पेस्ट पुसून घ्यावी. थंड पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा करावा. यामुळे आपल्या पायांच्या घोट्यांचा काळपटपणा कमी होऊन, तेथील त्वचा अधिक मऊ, मुलायम होऊन त्वचेचा रंग देखील उजळून येतो.