Join us  

डार्क सर्कल्समुळे चेहरा खराब दिसतोय? 4 उपाय, डार्क सर्कल्स कमी होऊन चेहरा दिसेल उजळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 3:56 PM

Dark Circles Solution : डोळ्यांना वारंवार चोळल्याने काळी वर्तुळे निर्माण होतात. चोळण्यामुळे उद्भवणाऱ्या पोस्ट-इंफ्लॅमेटरी हायपरपिग्मेंटेशनमुळे असे होते

काळी वर्तुळे (Dark Circles) ही एक कॉमन  समस्या बनली आहे ज्याचा सामना जगभरातील लाखो लोक करतात. ते लपवण्यासाठी स्त्रिया फॅन्सी चष्मा बनवतात, तर क्रीम आणि उपचारांवरही भरपूर पैसे खर्च करतात. तसे, पुरुष देखील या बाबतीत मागे नाहीत.  डार्क सर्कल्स त्यांच्यासाठीही चिंतेचा विषय बनले आहे. कारण ते त्यांच्या एकूण दिसण्यावर परिणाम करतात. (Solution for dark circles) डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा, निस्तेज दिसतो.  (3 reasons for dark circles and  its treatment shared by doctor jaishree sharad)

या सगळ्यामध्ये, प्रत्येकजण हे विसरून जातो की आपणच काळ्या वर्तुळांसाठी जबाबदार आहोत. (Dark circles solution)अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या नकळत त्यांच्या सवयीचा भाग बनतात आणि त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात आणि वाढू लागतात. अशी काही कारणे डॉ जयश्री शरद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अधोरेखित केली आहेत आणि लोकांना त्या सवयी त्वरित सोडण्याचा सल्ला दिला आहे. (Dark circles removal remedies)

डार्क सर्कल्सची कारणं

१) डोळ्यांना वारंवार चोळल्याने काळी वर्तुळे निर्माण होतात. चोळण्यामुळे उद्भवणाऱ्या पोस्ट-इंफ्लॅमेटरी हायपरपिग्मेंटेशनमुळे असे होते

२) धुम्रपान केल्याने देखील काळी वर्तुळे वाढतात. ते फ्री रॅडिकल्स सोडतात, ज्यामुळे काळी वर्तुळे वेगाने वाढतात.

३)  डोळ्यांखाली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन न लावल्याने देखील काळ्या वर्तुळांना आमंत्रण मिळते.

४) अपुरी झोप

५) ताण

६) हिमोग्लोबिन कमी होणे

७) इन्सुलिन रेजिस्टेंस

७) कॉस्मेटिक ऍलर्जी

८) डोळ्यांची ऍलर्जी

९) प्रदूषण, सुगंध इ.ची ऍलर्जी.

१०) जास्तवेळ उन्हात राहणं

उकळलेलं की फिल्टर केलेलं, कोणतं पाणी आजारांपासून बचाव करतं? डॉक्टर सांगतात....

दुसर्‍या पोस्टमध्ये डॉ. जयश्री शरद यांनी डार्क सर्कलवरील उपचारांबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी काळी वर्तुळे कशी दूर करता येतील हे सांगितले. 

१) हिमोग्लोबिन कमी असल्यास लोहयुक्त सप्लिमेंट्स घेणे.

२) 6 महिन्यांपेक्षा जास्त जुनी सौंदर्यप्रसाधने वापरू नका.

३) दररोज 6 ते 8 तासांची झोप घ्या. 

४) रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात रोजच्या आहारातले ६ पदार्थ; नियमित खा, ठणकणार नाहीत हाडं

५) जर तुम्हाला धूळ, धूर इत्यादींची अ‍ॅलर्जी असेल तर बाहेर जाताना नक्कीच मास्क घाला.

६) धूम्रपानाची सवय सोडा.

७) ध्यान किंवा प्राणायाम करा, जेणेकरून तुमचा ताण कमी होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी