त्वचेची कितीही काळजी घेतली तरी डार्क सर्कल्स येण्याची समस्या अनेकांना उद्भवते. काळी वर्तुळे (Dark Circles) दूर करण्यासाठी सर्वप्रथम पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा. सात तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. अशा स्थितीत, जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर कोणत्याही घरगुती उपायाचा परिणाम पूर्णपणे होणार नाही, म्हणून दररोज किमान 6-7 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. (Dark Circles Solution at Home) डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (All About Dark Circles And How To Remove Them Permanently)
1) बटाट्याचा रस
बटाट्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यासही मदत होते. बटाटा किसून घ्या आणि बटाट्याचा जास्तीत जास्त रस काढा. नंतर थोडा कापूस घेऊन बटाट्याच्या रसात पूर्णपणे भिजवून डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर
मांसाहारापेक्षा जास्त प्रोटिन मिळेल, फक्त ५ भाज्या खा; कायम तब्येत राहील ठणठणीत, मेंटेन
2) टि बॅग
टि बॅग्सचा वापर फक्त झटपट चहा बनवण्यासाठी केला जात नाही, तर त्यासोबत तुम्ही काळ्या वर्तुळांपासूनही सुटका मिळवू शकता. टि बॅग्स काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर डोळ्यांवर ठेवा. दिवसातून किमान दोनदा ही प्रक्रिया पुन्हा करा.
3) बदामाचं तेल
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. या उपायासाठी तुम्हाला बदामाचे तेल ते डार्क सर्कलवर लावायचे आहे आणि आता हलक्या हातांनी मसाज करायची आहे. ते धुण्याऐवजी काहीवेळ असेच ठेवा. सकाळी उठल्यावर डोळे स्वच्छ धुवा. त्याचा परिणाम आठवडाभरात दिसून येईल.
शरीराला प्रोटीन देण्यासह इम्युनिटी वाढवतात व्हेज ५ पदार्थ; नियमित खा, आजारांपासून लांब राहाल
4) थंड दूध
थंड दुधामुळे स्किन ग्लोइंग तर होतेच पण काळी वर्तुळेही दूर होतात. यासाठी थंड दुधात एक कापूस बुडवावा लागेल आणि नंतर तो गडद वर्तुळाच्या भागावर ठेवावा. 10 मिनिटे कापूस असाच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने डोळे धुवा.
5) संत्र्याचा रस
या उपायासाठी संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळावे लागतील आणि हे मिश्रण काळ्या वर्तुळांवर लावावे लागेल. यामुळे काळी वर्तुळे तर दूर होतीलच पण डोळ्यांना नैसर्गिक चमकही येईल.