Join us  

Dark circles solution at home : डार्क सर्कल्समुळे चेहरा खराब झालाय? फक्त १ कप दुध वापरून डार्क सर्कल्सपासून मिळवा सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 4:30 PM

Dark circles solution at home : चेहरा गोरा पण डार्क सर्कल्सने लूक बिघडवलाय? फक्त १ कप दुध वापरा, डार्क सर्कल्सची समस्या होईल दूर

(Image Credit- Stylewidsus)

डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circle) ही केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे. खूप जास्त स्क्रीन पाहणे, कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे असे घडू शकते.जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात, तेव्हा आपण थकलेले आणि वृद्ध दिसू लागतो. (Dark Circles Solution at Home) जर तुम्हालाही काळ्या वर्तुळांचा त्रास होत असेल तर दुधाचा वापर करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता, कारण काळ्या वर्तुळांच्या उपचारासाठी दूध खूप फायदेशीर आहे. यात त्वचा उजळण्याचे गुणधर्म आहेत. ( How to remove dark circle under eyes milk treatment almonds gulab jal easy tips)

डार्क सर्कल्स का येतात?

डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता, वृद्धत्व, कोरडी त्वचा, ताण घेणं,  संगणकासमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक ताण, झोप न लागणे आणि पौष्टिक आहाराचा अभाव यांचा समावेश होतो.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

डार्क सर्कल्सपासून सुटका कशी मिळवायची?

दूध आणि बदामाचं तेल

थंड दुधात थोडे बदामाचे तेल समान प्रमाणात मिसळा. या तयार मिश्रणात दोन कापसाचे गोळे बुडवा. डोळ्यांवर कापसाचे गोळे अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ताज्या पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय प्रत्येक दुसऱ्या दिवशी पुन्हा करू शकता.

थंड दूध

प्रथम एका भांड्यात थोडे थंड दूध घ्या. यानंतर त्यात दोन कापसाचे गोळे भिजवा. कापसाचे गोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. त्यांना 20 मिनिटे सोडा. आता कापसाचे गोळे काढा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण हे दररोज तीन वेळा ही क्रिया करू शकता. जेणेकरून फरक दिसून येईल.

कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

गुलाब पाणी आणि दूध

थंड दूध आणि गुलाबजल समान प्रमाणात मिसळा. मिश्रणात दोन कॉटन पॅड भिजवा त्यांना तुमच्या डोळ्यांवर ठेवा. याने काळी वर्तुळे झाकून टाका हे 20 मिनिटे तसेच राहू द्या. कॉटन पॅड काढा आणि ताज्या पाण्याने धुवा. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया आठवड्यातून 3 वेळा करू शकता.  हा उपाय केल्यानं काळी वर्तुळ  हळूहळू कमी होऊ लागतील.  

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स