Lokmat Sakhi >Beauty > Dark Elbow Remedies : हात गोरा, कोपर काळपट दिसतात? फक्त १० रूपयात चमकदार दिसेल काळ पडलेलं कोपर

Dark Elbow Remedies : हात गोरा, कोपर काळपट दिसतात? फक्त १० रूपयात चमकदार दिसेल काळ पडलेलं कोपर

Dark Elbow Remedies : पिगमेंटेशन आणि काळी त्वचा सुधारण्यासाठी हळदीचा वापर नेहमीच केला जातो. त्यामुळे हळदीचा मास्कसुद्धा कोपर उजळण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:49 PM2022-09-03T18:49:07+5:302022-09-03T18:58:43+5:30

Dark Elbow Remedies : पिगमेंटेशन आणि काळी त्वचा सुधारण्यासाठी हळदीचा वापर नेहमीच केला जातो. त्यामुळे हळदीचा मास्कसुद्धा कोपर उजळण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

Dark Elbow Remedies : How to lighten dark elbows naturally | Dark Elbow Remedies : हात गोरा, कोपर काळपट दिसतात? फक्त १० रूपयात चमकदार दिसेल काळ पडलेलं कोपर

Dark Elbow Remedies : हात गोरा, कोपर काळपट दिसतात? फक्त १० रूपयात चमकदार दिसेल काळ पडलेलं कोपर

 मानेनंतर, सर्वात जास्त त्रास लोकांना त्यांच्या कोपरांच्या काळेपणामुळे होतो. या काळपटपणाची वेगवेगळी कारणे असू शकतात जसे की टॅनिंग. हायपरपिग्मेंटेशन, गडद स्पॉट्स आणि कडक सूर्यप्रकाशात चालण्यामुळे, कोणत्याही ऍलर्जीमुळे तुमचे कोपर काळे होऊ शकतात. (Dark Elbow Remedies) मृत त्वचेच्या पेशी देखील याचे कारण असू शकतात. हा काळपटपणा म्हणजेच तुमची घाणेरडी कोपर साफ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करावेत. काळ्या कोपरामुळे होणारा पेच टाळण्यासाठी या उत्तम टिप्स वापरल्या जाऊ शकतात. (How to lighten dark elbows naturally)

१) बटाटा आणि टोमॅटो

हा उपाय करण्यासाठी ही तुम्हाला एक टोमॅटो आणि काही बटाटे बारीक करून त्याचा रस कोपरावर चोळावा लागेल आणि 10 मिनिटे सुकवावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कोपर धुवावे लागतील. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता.

२) दूध, हळद आणि मध

पिगमेंटेशन आणि काळी त्वचा सुधारण्यासाठी हळदीचा वापर नेहमीच केला जातो. त्यामुळे हळदीचा मास्कसुद्धा कोपर उजळण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. यासाठी एक चमचा  हळद घ्या आणि आवश्यकतेनुसार अर्धा चमचा मध आणि थोडे दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास कोपरावर ठेवा आणि नंतर पाण्याने काढून टाका. असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम देखील मिळतील.

३) कोरफड जेल

कोरफडीचा काळपटपणा दूर करण्यातही चांगला प्रभाव दिसून येतो. हा उपाय करण्यासाठी प्रथम कोरफड जेल किंवा ताज्या कोरफड पानांचा लगदा काढा आणि त्यात एक चमचे खोबरेल तेल आणि एक चमचे साखर मिक्स करावे. ही पेस्ट कोपरच्या काळ्या भागावर ५ मिनिटे चोळा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडू लागतात. नंतर ही पेस्ट सुती कापडाने कोपरावर फक्त ५ मिनिटे बांधून ठेवा. त्यानंतर ते काढून टाका आणि कोपर स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.

४) बटाटा

तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला एक छोटासा बटाटाही तुमची काळी कोपर उजळवू शकतो. यासाठी प्रथम बटाट्याचा रस काढा आणि नंतर मसाजप्रमाणे कोपरावर हळू हळू चोळा. त्यानंतर साधारण 15 मिनिटे ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

Web Title: Dark Elbow Remedies : How to lighten dark elbows naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.