डार्क फ्लोरल म्हणजे एक सहज, सुंदर ट्रेंड! अगदी लहान मुलींपासून, कॉलेज गोअर्स, नोकरी करणाऱ्या तरुण मुली, स्त्रिया सगळ्यांना आवडणारा आणि शोभून दिसणारा असा हा डार्क फ्लोरल ट्रेंड! कोणी फ्लोरल प्रिंटेड मॅक्सि वापरावी, कोणी शॉर्ट ड्रेस, कुर्ता, टॉप म्हणून वापरावे तर कोणी फक्त स्कार्फ घ्यावा! टवटवीत आणि बांधेसूद दिसायला डार्क फ्लोरल नक्कीच मदत करतात.
(छायाचित्र सौजन्य-गुगल)
आता पावसाळ्यात आणि कोरोनाकाळातही आपला मूड जरा मस्त करायचा तर हा डार्क फ्लोरल प्रिंटेडचा पर्याय मस्त आहे. आता तर करिना कपूर, आलिया भट, ते दीपीका-जान्हवी कपूरही अनेकदा या डार्क फ्लोरल कपड्यांत दिसतात.
कुर्ता, लॉन्ग टॉप आणि लेगिंग हे अगदी आपले आवडीचे रोजचेच कॉम्बिनेशन आहे. तेंव्हा नेहमीच्या कॉटन कुर्त्याला ब्रेक देऊन शिफॉन, जॉर्जेट कापडामध्ये फ्लोरल प्रिंटेड कुर्ता नक्की ट्राय करा.
(छायाचित्र सौजन्य-गुगल)
गडद रंगाच्या बेस वर मोठे फ्लोरल प्रिंट ही कोणत्याही वेळेसाठी छान दिसणारं कॉम्बिनेशन आहे. कुठंही हमखास फ्रेश दिसायचं असल्यास मग अगदी कॉलेज, कॅज्युअल ड्रेस म्हणून, पार्टी साठी डार्क फ्लोरल हा अचूक नेम ठरतो! शिवाय बिझी प्रिंट असल्याने फ्लोरल प्रिंट पावसाळ्यासाठी अगदी योग्य पर्याय ठरतो.
त्यामुळे पाऊस सुरु झालाच आहे, काही मस्त कॉम्बिनेशन ट्राय करायचं, जरा मरगळ कमी करायची तर हा पर्याय उत्तम.
प्लोरल प्रिण्ट हा ऑप्शन पावसाळ्यात नक्की ट्राय करा, मूड आणि लूक दोन्हीही बदलू शकते.