Join us  

Dark Neck Removal Home Remedies : उन्हामुळे मानेची त्वचा खूपच मकळट, काळपट झालीये? ४ उपायांनी मिळवा उजळदार त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 3:38 PM

Dark Neck Removal Home Remedies : अनेकदा चेहरा गोरा आणि मान काळी पडलेली असेल तर ते चारचौघात व्यवस्थित दिसत नाही. तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ  शकतो.

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण कडक सूर्यप्रकाश आणि घाम यांमुळे त्वचा काळी पडू लागते. चेहऱ्याला टॅन होण्यापासून वाचवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करत असलो तरी मानेभोवतीची त्वचा काळी पडण्याकडे दुर्लक्ष करतो. (Skin Care Tips)  मानेचा काळेपणा संपूर्ण चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करतो. अनेकदा चेहरा गोरा आणि मान काळी पडलेली असेल तर ते चारचौघात व्यवस्थित दिसत नाही. तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ  शकतो.

मानेवरील काळेपणा काढून टाकण्यासाठी  काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.  (Dark Neck Removal Home Remedies)  या लेखात तुम्हाला मोजक्या साहित्यापासून अवलंबले जाणारे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही  त्वचवरचा काळपटपणा सहज घालवू शकता. (Dark Neck Solution At Home)

1) मध आणि लिंबू

एका वाडग्यात एक चमचा लिंबाचा रस आणि मध मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवरील काळपट भागावर हळूवार हाताने घासून घ्या. १० मिनिटांनी मान स्वच्छ पाण्यानं धुवा. या उपायाने मानेवरील डाग दूर होतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.

फक्त २ मिनिटात गायब होईल छातीतली जळजळ अन् अ‍ॅसिडिटी ; 5 साधे उपाय, ताबडतोब मिळेल आराम

२) दूध, हळद आणि बेसन

ही खास पेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी एक चमचा दूध आणि बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट मानेच्या प्रभावित भागावर लावा आणि कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. आता मानेला चोळताना स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय केल्यानं तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.

३) लिंबू आणि बेसन

एका भांड्यात एक वाटी लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि काही वेळ कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. यानंतर मानेला चोळून पाण्याने स्वच्छ करा.

केस विंचरताना खूपच गळतात? दाट केसांसाठी फक्त एका पदार्थानं रोज करा मसाज , तिप्पट वाढतील केस

४) दही आणि कच्ची पपई

प्रथम कच्ची पपई चांगली बारीक करून घ्या, त्यानंतर त्यात दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. यानंतर, पेस्ट प्रभावित भागावर घासून कोरडी होऊ द्या, नंतर धुवा.  या  उपायांनी मानेवरचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी