उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेचे फार हाल होतात. तसेच ओठांचीही अगदी वाट लागून जाते. सतत फुटतात. झोंबतात. ओठांचा रंगही गडद होतो. (Darkened lips will become pink again and soft like cotton, see simple but effective home remedies)फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतरही ऋतूंमध्ये ओठ सुकतात, फुटतात. त्यांचे आरोग्य आपण विविध पर्यायांचा उपयोग करुन चांगले ठेवतो. त्यासाठी काही क्रिमही वापरतो. मात्र कितीही काळजी घेतली तर ओठ अगदीच फिके दिसतात किंवा मग अगदीच गडद रंगाचे दिसतात. (Darkened lips will become pink again and soft like cotton, see simple but effective home remedies)ते छान गुलाबी दिसावे यासाठी मग फिकट लिपस्टीप महिला वापरतात.
मात्र असे काही उपाय आहेत ज्यांचा वापर केल्याने ओठ नैसर्गिकरित्या छान गुलाबी होतील. तसेच अगदी कापसासारखे मस्त मऊ होतील. काही उपाय आणि सवयी जाणून घ्या. ज्यांच्यामुळे ओठ सुंदर दिसतील.
१. ओठ चावायची सवय अनेकांना असते. ओठ सतत चावल्याने ओठांचा मऊपणा निघून जातो. त्यामुळे अशी सवय तुम्हालाही असेल तर ती बदला. ओठ सारखे चाऊ नका.
२. गुलाब पाणी फार थंड असते. ओठ फुटण्याचे महत्त्वाचे कारण उष्णता आहे. रोज कापसावर गुलाब पाणी घेऊन ओठांवर त्या पाण्याने मसाज करायचा. असे केल्याने ओठ छान मऊ होतात. तसेच ओठांचा काळपटपणाही कमी होतो.
३. सगळ्यात मस्त उपाय म्हणजे बीटाचा रस. बीटाचा रंग गुलाबी असतो. बीट हा रंगाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. फुड कलरसाठीही बीटाचा वापर केला जातो. बीटाचा रस काढून ओठांना लावायचा. ओठांना पोषणही मिळेल. ओठ छान गुलाबी होतील.
४. ज्या प्रकारे आपण फेस मास्क वापरतो आणि हेअर मास्कही वापरतो. त्याच प्रकारचा लिप मास्क मेडीकलमध्ये मिळतो. तो मास्क महिन्यातून एकदा ओठांना लावा. डेड स्कीन तसेच इतर काही त्रास असतील तर गायब होतात.
५. डिहायड्रेशनमुळेही ओठांचा रंग बदलतो. तसेच ओठ फुटतातही. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या.
६. झोपताना ओठांना खोबरेल तेल लावा. ओठ लगेच मऊ होतील. खोबरेल तेल प्रत्येक अवयवासाठी फायद्याचे आहे. ओठांसाठी बदामाचे तेलही फायद्याचे ठरते.