Lokmat Sakhi >Beauty > काखेतला काळेपणा प्रचंड वाढला आहे? ५ घरगुती सुरक्षित उपाय, काळपटपणा कमी होईल

काखेतला काळेपणा प्रचंड वाढला आहे? ५ घरगुती सुरक्षित उपाय, काळपटपणा कमी होईल

5 Home remedies to lighten dark underarms काखेतला वाढता काळेपणा, खूप घाम येणं हा त्रास असेल तर घरगुती उपायांसह वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2023 02:48 PM2023-02-09T14:48:43+5:302023-02-09T14:51:28+5:30

5 Home remedies to lighten dark underarms काखेतला वाढता काळेपणा, खूप घाम येणं हा त्रास असेल तर घरगुती उपायांसह वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Darkness in the armpits has increased dramatically? 5 Home Safe Remedies to Reduce Darkness | काखेतला काळेपणा प्रचंड वाढला आहे? ५ घरगुती सुरक्षित उपाय, काळपटपणा कमी होईल

काखेतला काळेपणा प्रचंड वाढला आहे? ५ घरगुती सुरक्षित उपाय, काळपटपणा कमी होईल

आता लवकरच गर्मीचा सिझन सुरु होईल. गर्मी सुरु झाल्यानंतर लोकं सुती आणि बिना बाह्यांचे कपडे परिधान करतात. मात्र स्लीव्हलेस कपडे परिधान करणे काही महिलांसाठी थोडे अवघड होऊन जाते. अंडरआर्म्सवरील केस आणि काळवंडलेल्या त्वचेमुळे महिला स्लीव्हलेस कपडे परिधान करणे टाळतात. आपण जर या कारणामुळे बिना बाह्यांचे कपडे परिधान करणे टाळत असाल तर, तसे करू नका.काळवंडलेली त्वचा आपण घरगुती उपायांनी देखील घालवू शकता.

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही महिला महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. काखेतील त्वचा संवेदनशील असल्यामुळे केमिकल प्रोडक्ट्स त्वचेवर थेट परिणाम करतात. अशा प्रसंगी काखेतील काळपटपणा आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण होते. अंडर आर्म्सची त्वचा उजळवण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक साहित्य उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. नैसर्गिक साहित्यांना घेऊन सोप्या टिप्स फॉलो करा, आणि काखेतील काळपटपणा घालवा.

काखेतील काळपटपणा घालवण्याचे ५ सोप्या टिप्स

लिंबू

लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. आंघोळ करण्यापूर्वी, लिंबाचा रस काखेत लावून चोळा. एक ते दोन मिनिटे लिंबू काखेत चोळल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. यामुळे काळपटपणा कमी होईल. काही दिवसात याचा फरक दिसून येईल.

ऑलिव्ह ऑइल

पूर्वीपासून महिला त्यांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत आलेत. याने चेहरा तुकतुकीत होते. यासाठी एका वाटीत ऑलिव्ह ऑइल घ्या त्यात एक चमचा ब्राऊन शुगर मिसळा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर एक ते दोन मिनिटे हे स्क्रब काखेत लावा. २ मिनिटे झाल्यानंतर स्क्रब सामान्य पाण्याने धुवून काढा. याने काखेतील काळपटपणा कमी होईल.

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर फक्त अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी उपयुक्त नाही तर, त्वचेवरील मृत पेशी देखील काढून टाकते, त्यातील सौम्य ऍसिड नैसर्गिक रुपात त्वचेवरील घाण साफ करण्याचे काम करते. यासाठी एका वाटीत ऍपल सायडर व्हिनेगरसह बेकिंग सोडा मिसळा. व हे मिश्रण काखेत लावा. मिश्रण कोरडे झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

खोबरेल तेल

केस आणि त्वचेसाठी खोबरेल तेल एका औषधाप्रमाणे कार्य करते. नैसर्गिक पद्धतीने त्वचा उजळवायची असेल तर, खोबरेल तेलाचा वापर करा. यात त्वचा उजळवणारे एजंट, व्हिटॅमिन ई आढळते. नारळाच्या तेलाने दररोज अंडरआर्म्सची मालिश करा, तेल त्वचेवर पंधरा मिनिटे राहू द्या, त्यानंतर पाण्याने धुवा. उत्तम रिझल्टसाठी याचा नियमित वापर करा.

बेकिंग सोडा

काखेतील काळपटपणा घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर हा बेस्ट ऑप्शन ठरेल. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा. कोरडे झाल्यानंतर धुवा. उत्तम रिझल्टसाठी ही पेस्ट आठवड्यातून दोनदा अंडरआर्म्सवर लावा.

Web Title: Darkness in the armpits has increased dramatically? 5 Home Safe Remedies to Reduce Darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.