Join us  

कोरड्या त्वचेला खजूर देईल नवी चमक, असा करा त्याचा वापर, चेहरा करेल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 8:32 PM

Dates Facemask खजूर खाण्यासाठी पौष्टिक आहेच, यासह चेहऱ्यासाठी देखील किफायतशीर आहे. खजूर फेसपॅक चेहऱ्यावर एकदा नक्की ट्राय करा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांना स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. चेहऱ्याची काळजी असो या केसांची निगा राखणे. महिला कामात पुरते बुडालेले असतात. त्वचेला ग्लो आणि चमकदार बनवण्यासाठी महिला महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र, काही प्रोडक्ट्स केमिकलयुक्त असल्यामुळे काहींच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम करतात. महागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता खजूरचा वापर करून आपण चेहऱ्याला नवी चमक देऊ शकता. खजूर खाण्यासाठी पौष्टिक आहेच, यासह चेहऱ्यासाठी देखील किफायतशीर आहे. हिवाळ्यातील कोरड्या त्वचेवर खजूर एक रामबाण उपाय म्हणून काम करते.

खजूरचा फेसपॅक चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. खजूरमध्ये पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अँटी- ऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे खजूर आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे.

खजूरचा फेसपॅक बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम तीन ते चार खजूर घ्या. या खजूरमधील बिया काढून टाका. हे खजूर रात्रभर दुधामध्ये भिजवत ठेवा. सकाळी दूध आणि खजूरमध्ये एक चमचा क्रीम टाका आणि मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या.

या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. अशा पद्धतीने तुमचा फेसपॅक तयार होईल. हा फेसपॅक हलक्या हाताने चेहऱ्याला व्यवस्थित लावा. यानंतर चेहरा असाच ठेवा. फेसपॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

खजूर फेसपॅकचे फायदे

खजूरचा फेसपॅक लावल्यामुळे कोरड्या आणि खरबडीत त्वचेवर चमक येते.

खजूरचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

खजूरचा फेसपॅक लावल्याने टॅनिंगची समस्या देखील दूर होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी