बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही त्यापैकीच एक अभिनेत्री. दीपिका बॉलीवूडची सगळ्यात फेमस अभिनेत्री असून तिच्या सौंदर्याचे व अभिनयाचे अनेक फॅनफॉलोअर्स आहेत. दीपिका नेहमीच तिच्या स्किनची विशेष काळजी घेताना दिसून येते. दीपिकाची स्किन नेहमी ग्लोइंग आणि यंग दिसते, यामागचं कारण म्हणजे तिचं स्किन केअर रूटीन(What skincare does Deepika Padukone use).
मोठ्या पडद्यावरची स्टार दीपिका पदुकोण त्वचा ग्लोइंग आणि मुलायम ठेवण्यासाठी तिच्या स्किनकेअर रुटीनमध्ये काही खास उपाय करते. दीपिका डेली स्किन केअर रुटीनमध्ये महागडे कॉस्मॅटिक्स किंवा क्रिम्स वापरण्याऐवजी पारंपरिक गोष्टींना प्राधान्य देते. दीपिका ग्लोइंग आणि फ्लॉलेस स्किनसाठी आयुर्वेदातील मंजिष्ठाचा वापर करते. मंजिष्ठापासून (Deepika Padukone use Manjishtha for skin) तयार झालेला फेसपॅक ती वापरते. नुकतेच दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या डेली स्किन केअर रुटीनचा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. आपल्या स्किनसाठी दीपिका नेमके काय काय करते आणि पारंपरिक पदार्थांचा वापर स्किनसाठी कसा करते ते पाहूयात(Deepika Padukone's Secret To Her Glowing Skin REVEALED).
स्किनसाठी मंजिष्ठाचा वापर कसा करावा ?
मंजिष्ठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मंजिष्ठा ही एक लहान वनस्पती आहे, ज्याची मुळे लाल रंगाची असतात. ही मुळे वाळवली जातात आणि त्याची पावडर बनवली जाते, ज्याचा उपयोग अनेक औषधी उपचारांमध्ये केला जातो. शतकानुशतके वापरात असलेली ही औषधी वनस्पती त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
मंजिष्ठा ही औषधी वनस्पती इतकी फायदेशीर आहे की दीपिकाही तिचा वापर करते. मुरुम, सूज आणि पिगमेंटेशन इत्यादी त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी मंजिष्ठ फायदेशीर आहे. मंजिष्ठाचा उपयोग पित्त दोष संतुलित करण्यासाठी केला जातो, जो त्वचेशी संबंधित समस्यांचे मुख्य कारण आहे. मंजिष्ठा औषधी वनस्पती पित्त दोष शांत करते आणि चेहरा उजळण्यास मदत करते.
दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या स्किन केअर पोस्टमध्ये मंजिष्ठाचा उल्लेख केला आहे. दीपिका मंजिष्ठाच्या मुळांपासून बनवलेल्या फेसपॅकचा वापर करताना दिसते. हा फेसपॅक बनवण्यासाठी जर मंजिष्ठाची मूळ उपलब्ध नसतील तर तुम्ही बाजारातून मंजिष्ठाची पावडर देखील विकत घेऊ शकता आणि जर ती उपलब्ध नसेल तर तुम्ही मंजिष्ठाची मुळे विकत घेऊन त्याची पावडर बनवू शकता. ही पावडर वापरुन तुम्ही त्याचा फेसपॅक बनवू शकता.
१. ग्लोइंग त्वचेसाठी मंजिष्ठाचा फेसपॅक...
फेसमास्क बनवण्यासाठी, एका बाऊलमध्ये २ चमचे मंजिष्ठा पावडर आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घाला. हे चांगले मिसळा आणि स्मूद फेसपॅक बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटे चेहेऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसमास्क वापरल्याने तुमची त्वचा ग्लोइंग होण्यास मदत होईल.
२. त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी मंजिष्ठाचा फेसपॅक...
एका भांड्यात आवश्यकतेनुसार २ चमचे मंजिष्ठा पावडर, १ चमचा मध, १ चमचा टोमॅटोचा रस आणि गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तो तसाच चेहेऱ्यावर ठेवून द्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यास मदत मिळेल.