Lokmat Sakhi >Beauty > दीपिका पदुकोण सांगते, सुंदर दिसायचं तर शिस्तीत 4 नियमांचं करा पालन, रोज-न विसरता! 

दीपिका पदुकोण सांगते, सुंदर दिसायचं तर शिस्तीत 4 नियमांचं करा पालन, रोज-न विसरता! 

आपण आपल्या आरोग्याची, फिटनेसची जशी काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही गंभीर असायला हवं. त्वचा तर शरीराचा अगदी नाजूक भाग मग तिची काळजी घेताना शिस्तबध्दता आणि नियमितपणा हवा याबाबत दीपिका ठाम आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 05:24 PM2021-12-28T17:24:35+5:302021-12-30T17:50:33+5:30

आपण आपल्या आरोग्याची, फिटनेसची जशी काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही गंभीर असायला हवं. त्वचा तर शरीराचा अगदी नाजूक भाग मग तिची काळजी घेताना शिस्तबध्दता आणि नियमितपणा हवा याबाबत दीपिका ठाम आहे.

Deepika Padukone says, if you want to look beautiful, follow 4 rules in discipline, everyday - without forgetting! | दीपिका पदुकोण सांगते, सुंदर दिसायचं तर शिस्तीत 4 नियमांचं करा पालन, रोज-न विसरता! 

दीपिका पदुकोण सांगते, सुंदर दिसायचं तर शिस्तीत 4 नियमांचं करा पालन, रोज-न विसरता! 

Highlightsरोजच्या आहारात ताजी फळं त्वचेच्या फिटनेससाठी नियमत व्यायाम गरजेचाच.सुंदर दिसण्यासाठी मेकअप करा, पण त्वचा सुंदर राखण्यासाठी मेकअप आवर्जून काढासुध्दा!

83 सिनेमा प्रदर्शित झाला आणि दीपिका पदुकोणच्या लूकची, तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. कमी मेकअपमधेही दीपिका किती ग्लॅमरस दिसते हे तिला कसं जमतं, की ही देखील मेकअपची कमाल असा प्रश्न पडला असेल तर दीपिका आपल्या त्वचेची काळजी किती गांभिर्यानं घेते हे समजून घ्यायला हवं. अर्थात दीपिका बघा मी किती त्वचेला जपते अशा चमकोबाजी करत नाही. आपण आपल्या आरोग्याची, फिटनेसची जशी काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही गंभीर असायला हवं. त्वचा तर शरीराचा  अगदी नाजूक भाग मग तिची काळजी घेताना शिस्तबध्दता आणि नियमितपणा हवा याबाबत दीपिका ठाम आहे. मऊ-मुलायम- चमकदार त्वचा ही एका दिवसात किंवा एखाद्या प्रोडक्टकच्या वापरानं चमत्कार व्हावा तशी सहज होत नाही.  त्यासाठी काही गोष्टींची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते असं दीपिका म्हणते.

Image: Google

ग्लोइंग त्वचा, निरोगी त्वचा ही फक्त सेलिब्रेटी असलेल्या स्त्रियांचीच गरज नसते.सर्वसामान्य स्त्रियांचंही हेच स्वप्न असतं. दीपिकासारखी त्वचा हवी असेल तर ती असं काय खास करते हे जाणून घ्यायला हवं.

ग्लोइंग स्कीनसाठी दीपिकाचे 4नियम

1 रोज फळं खा
दीपिका म्हणते आहार हा सौंदर्य प्राप्तीसाठीचा महत्त्वाचा घटक. आणि आहारातही फळं सर्वात महत्त्वाची. दीपिका आपल्या आहारात फळांचा आवर्जून समावेश करते. फळांमुळे केवळ शरीराची रोगप्रतिकारशक्तीच वाढते असं नाही तर त्वचा मऊ, मुलायम, सुंदर होते आणि  त्वचेवर हवी असलेली चमकही येते.  फळं ही कधीमधी , मनात आलं तरच खाल्ली असं नाही. तर ती नियमित खायला हवीत. तरच फळांमधील ॲण्टिऑक्सिडण्टस, खनिजं, जीवनसत्त्वं यांचा फायदा त्वचेला होतो. फळं जर आहारात नियमित असली तर फळांमधील या महत्त्वाच्या घटकांचा उपयोग त्वचेतल्या कोलॅजनची निर्मिती व्हायला होतो. त्वचेचं पोषण होतं.  त्वचेत जर कोलॅजनची निर्मिती उत्तम होत असेल तर त्वचा उजळ आणि चमकदार दिसते. त्वचेचा पोतही सुधारतो.

Image: Google 

त्वचा जपण्यासाठी दीपिका रोज ताजी आणि हंगामी फळं खाते, वरुन साखर न घातलेल्या फळांचा रस घेते. डाळिंबाचा रस, कलिंगडचा रस यामुळे त्वचेत ओलसरपणा निर्माण होतो. फळं, फळांमधील फायबर आणि फळांचा रस या गोष्टी सौंदर्य प्राप्तीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्यानं फळं हा दीपिकाच्या आहारातील  महत्त्वाचा घटक आहे. 

Image: Google

2. फेस रोलरनं मसाज

त्वचा तरुण आणि ताजी तवानी दिसण्यासाठी फेस रोलर वापरणं दीपिकाला महत्त्वाचं वाटतं. दीपिका आपल्या गालावरुन फेस रोलर फिरवत असल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे काय असा प्रश्न पाहाणाऱ्याला पडतो. शेविंग रेझर सारखा दिसणारा हा फेस रोलर त्वचेची काळजी घेताना अत्यंत उपयोगाचं साधन असल्याचं दीपिका म्हणते.  दीपिका म्हणते मी जेव्हा चेहऱ्याला क्रीम किंवा सीरम लावते तेव्हा गालावरुन फेस रोलर फिरवते. यामुळे चेहऱ्याला लावलेलं क्रीम/ सीरम त्वचेत खोलवर जातं आणि परिणामकारक ठरतं. त्वचा उत्तम ठेवायची तर त्वचा केवळ स्वच्छ करुन भागत नाही, तर त्वचेला रोज मसाज हवा असतो. मसाजमुळे चेहऱ्याच्या त्वचेखालील रक्तवाहिन्या सक्रीय होतात. रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे चेहरा ताजा, प्रसन्न आणि उजळ दिसतो. फेस रोलर हा चेहऱ्याच्या त्वचेच्या मसाजसाठीचं उत्तम साधन आहे असं दीपिका म्हणते.

Image: Google

3.सुंदर त्वचेसाठी व्यायाम गरजेचा

दीपिका फिटनेसच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. रोज व्यायाम करणं हा तिचा नियम आहे. बॉलिवूडमधील सुंदर आणि फिट अभिनेत्री अशी दीपिकाची ओळख आहे. हे सौंदर्य आणि फिटनेस मिळवायचा आणि टिकवायचा असल्यास व्यायाम आवश्यक असल्याच दीपिका म्हणते. व्यायामानं जो घाम निघतो तो खूप महत्त्वाचं काम करतो. यामुळे त्वचेची धूळ, दूषित घटक यामुळे बंद झालेली रंध्र मोकळी होतात. त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते. तसेच घामावटे शरीरातील दूषित घटक बाहेर पडतात. त्वचा आणि शरीर डीटोक्स व्हायला मदत होते. व्यायामामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेकडील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेला ऑक्सिजन मिळतो. या दोन्ही गोष्टी त्वचा उजळ होण्यासाठी आणि त्वचेवर तेज येण्यासाठी महत्त्वाच्या असतात.  आपलं शरीर आतून बाहेरुन चांगलं करायचं असेल तर नियमित व्यायाम या नियमाचं पालन न चुकता करायला हवं. 

Image: Google

व्यायामामुळे त्वचेतील कोलॅजनची निर्मिती चांगली होते. कोलॅजनमुळे प्रथिनं मिळतात. प्रथिनांमुळे त्वचेचा पोत सुधारतो. संथ गतीचा लयबध्द व्यायाम , वेगवान व्यायाम  झाल्यानंतर लगेच स्पा केल्यास किंवा वाफ घेतल्यास/ वाफेचं स्नान केल्यास त्वचेवर चांगला परिणाम होतो.  व्यायामानंतर स्पा केल्यामुळे मला त्वचेवर चांगला परिणाम दिसतो असं दीपिका स्वत:चा अनुभव सांगताना म्हणते. 

Image: Google

4. मेकअप काढल्याशिवाय झोपायचं नाही!

ब्युटी केअरमधे मेकअपचाही समावेश आहे. थोडा किंवा जास्त मेकअप करणं ही जणू गरज झाली आहे. पण मेकअप केल्यानंतर तो रात्री झोपण्याच्या आधी काढण्याचा कंटाळा येतो. असा कंटाळा दीपिका कितीही थकलेली असली तरी करत नाही. रात्री कितीही उशीर झाला तरी आधी चेहऱ्यावरचा मेकअप काढून चेहरा स्वच्छ करणं आणि चांगल्या दर्जाच्या नाइट क्रीमनं चेहऱ्याचा मसाज करुन मग झोपणं ही माझी दीनचर्या आहे असं दीपिका म्हणते.  दिवसा केलेला मेकअप रात्रभर चेहऱ्यावर राहातो तेव्हा मेकअपमुळे चेहऱ्याची रंध्रं बंद राहातात. चेहऱ्याच्या त्वचेला श्वास घेता येत नाही. तसेच आपण झोपतो तेव्हा त्वचेच्या पेशीच्ं नुकसान भरुन निघतं, त्वचा दुरुस्त होण्याचं काम होतं. पण त्यासाठी चेहऱ्यावर मेकअप नसणं ही गरज आहे. झोपण्याआधी मेकअप काढला नाही तर् त्वचा खराब होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, हसतो तेव्हा ओळांपाशी सुरकुत्या दिसतात.  हे टाळायचं असेल तर सुंदर दिसण्यासाठी केलेला मेकअप त्वचेच्ं सौंदर्य जपण्यासाठी झोपण्याधी काढायलाच हवा ,असा सल्ला दीपिका इतरांनाही देते. 


 

Web Title: Deepika Padukone says, if you want to look beautiful, follow 4 rules in discipline, everyday - without forgetting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.