आई झाल्यावरही बाळासोबतच स्वतःची देखील तिकीच काळजी घेणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. सौंदर्य आणि फिटनेस क्वीन म्हणून बॉलीवूडमध्ये तिची ओळख आहे. दीपिका फिटनेससोबतच आपल्या त्वचा आणि केसांचीही तितकीच काळजी घेते. दीपिकाची स्किन नेहमी ग्लोइंग आणि यंग दिसते, यामागचं कारण म्हणजे तिचं स्किन (Deepika Padukone's secret Juice for Glowing Skin) केअर रूटीन. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. दीपिका पदुकोण ही त्यापैकीच एक अभिनेत्री. लग्नात आपली त्वचा सुंदर, नितळ (Want a bride-like glow Try Deepika Padukone's secret juice) आणि ग्लोइंग दिसावी यासाठी दीपिकाने लग्नापूर्वी तीन महिने एका खास घरगुती पदार्थांचा ज्यूस घेतला होता. हा ज्यूस घेतल्यामुळे लग्नाच्या दिवशी तिची त्वचा अगदी सुंदर, ग्लोइंग, चमचमती दिसत होती. तिच्या या खास सिक्रेट ड्रिंकची रेसिपी सध्या इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणांत व्हायरल होत आहे. यंदा जर आपले देखील कर्तव्य असेल किंवा तुम्ही देखील 'ब्राईड टू बी' होणार असाल आणि तुम्हाला देखील दीपिका सारखा गुलाबी, चमचमता ग्लो हवा असेल तर लग्नापूर्वी हा दीपिकाचा सिक्रेट ज्यूस प्यायला विसरू नका(Deepika Padukone's Favourite Drink for glowing skin).
साहित्य :-
१. पुदिना - १ कप २. कोथिंबीर - १ कप ३. कडुलिंबाची पाने - १ कप ४. कडीपत्ता - १ कप ५. बीटरुट - १ कप ६. पाणी :- गरजेनुसार
घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...
चमचाभर गव्हाचे पीठ, पायांच्या भेगा - काळपटपणा छूमंतर! घ्या उपाय, वाटेल आधीच का नाही केला...
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पान, कोथिंबीर, कडुलिंबाची पाने, कडीपत्ता, बीटरुटचे मध्यम आकाराचे तुकडे घालून सगळे मिश्रण एकत्रित वाटून घ्यावे. २. मिक्सरच्या भांड्यात तयार झालेल्या पल्पमध्ये गरजेनुसार थोडे पाणी घालावे. आता सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. ३. तयार ज्यूस एका ग्लासात काढून घ्यावा. हा ज्यूस आता पिण्यासाठी तयार आहे.
दिपीका तिच्या स्किन केअरसाठी पिते हा खास ज्यूस...
दीपिका म्हणते की ती नियमितपणे हा ज्यूस पिते. हा ज्यूस पुदिन्याची पान, कोथिंबीर, कडुलिंबाची पाने, कडीपत्ता, बीटरुट या पदार्थांचा एकत्रित केलेला ज्यूस आहे. आता हा ज्यूस का प्यावा, त्याने आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूया..
१. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हा ज्यूस अतिशय फायदेशीर ठरतो.
२. पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगल्या होण्यासाठी हा ज्यूस मदत करतो.
३. दीपिका पदुकोण जो ज्यूस पिते त्यातून दिवसभर पुरेल एवढी एनर्जी मिळते. शरीराचा थकवा दूर होतो. शिवाय फायबर भरपूर असल्याने हा ज्यूस वेटलॉस करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरतो.
४. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण जास्त असते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
५. त्वचेवर आलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या घालवण्यासाठी नियमित हा ज्यूस प्या. सूर्याच्या प्रकाशामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा ज्यूस मदत करतो.
६. या ज्यूसमुळे त्वचा टवटवीत होते. सोबतच अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होते. जर त्वचा तुकतुकीत, चमकदार हवी असेल तर, आहारात या ज्यूसचा समावेश करावा.