Lokmat Sakhi >Beauty > शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा

शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा

Dehydration test : ओठांना जास्त कोरडेपणा आणि बरेच तास लघवी न करणे, उलट्या होणे आणि अतिसार. डिहायड्रेशनमुळे आपल्याला दुष्परिणाम जाणवू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:15 PM2021-06-06T19:15:30+5:302021-06-07T14:25:09+5:30

Dehydration test : ओठांना जास्त कोरडेपणा आणि बरेच तास लघवी न करणे, उलट्या होणे आणि अतिसार. डिहायड्रेशनमुळे आपल्याला दुष्परिणाम जाणवू शकतात

Dehydration test : Check if you are drinking enough water with this dehydration test | शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा

शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा

Highlightsशरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून कमी रक्तदाब, चक्कर येणे यासारखी डिहायड्रेशनची लक्षणं टाळता येतील.

 गरमीच्या दिवसातच नाही तर ऐरवीसुद्धा डिहाड्रेशनची समस्या अनेकांना उद्भवते. कमी प्रमाणात पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशन (Dehydration treatment)  होऊ शकते. खरं तर, आपल्या शरीरातील एक तृतीयांश भागात पाणी असते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात कमी पाणी पिणे आणि शरीरावर जास्त घाम येणे यामुळे शरीरातील मीठ आणि पाण्याचे संतुलन बिघडते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या सुरू होते. ही समस्या कोणत्याही वर्गाला होऊ शकते.

शरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून कमी रक्तदाब, चक्कर येणे यासारखी डिहायड्रेशनची लक्षणं टाळता येतील. आता प्रश्न असा आहे की आपण हायड्रेटेड आहात की नाही हे आपल्याला कसे समजेल? म्हणून काळजी करू नका. अलीकडेच सेलिब्रिटी डायटिशियन पूजा माखीजाने तिच्या इंस्टाग्रामवर एक साधी ट्रिक शेअर केली आहे. या युक्तीने आपण हे जाणून घेऊ शकता की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता (signs of dehydration) आहे की नाही

 

घरीच पाण्याच्या कमतरतेची चाचणी कशी करायची

अलिकडेच सेलिब्रिटी डायटिशियन पूजा मखीजानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं आहे की, सोप्या पद्धतीनं तुम्ही शरीरात पाण्याची कमतरता आहे की नाही हे ओळखू शकता. यासाठी जास्त काही करायची आवश्यकता नाही फक्त तुमचा हात पुढे करा.  त्यानंतर  हातामधील कोणतंही बोट किंवा हाताच्या मागची त्वचा वरच्या बाजूनं खेचण्याचा प्रयत्न करा. पिंच केल्यानंतरही त्वचा लगेचच खाली जात असेल तर समजा तुमची त्वचा डिहाड्रेट आहे. 

डिहायड्रेशनमुळे शरीराला येत असलेल्या समस्या

डिडायड्रेशनमुळे खूप तहान लागते. जास्त पाणी पिऊन तुम्ही आपली तहान भागवू शकता. याव्यतिरिक्त, ब्लड प्रेशर कमी होणं, वेगानं श्वास घेणं, ओठ आणि जीभ सुकणं, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणं, कमी प्रमाणात लघवी बाहेर पडणं, गॅस अपचनाची समस्या, मासपेशीतील वेदना, जास्त थकवा येणं. डिहायड्रेशन दरम्यान उद्भवणार्‍या या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. याशिवाय मुलांमध्ये डिहायड्रेशनची काही वेगळी लक्षणे दिसू शकतात. जसे की ओठांना जास्त कोरडेपणा आणि बरेच तास लघवी न करणे, उलट्या होणे आणि अतिसार. डिहायड्रेशनमुळे आपल्याला दुष्परिणाम जाणवू शकतात. मुलांमध्ये आपल्याला हा प्रकार दिसल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिहायड्रेशनपासून बचाव कसा करायचा?

उन्हाळ्यात पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी, लिंबू पाणी अशा इतर पौष्टिक पेयांचे सेवन करावे.

पाण्यानं समृद्ध फळे खा. टरबूज, खरबूज, पपई, लीची, काकडी, संत्री इ.

उन्हाळ्यात व्यायाम केल्यानं शरीराला खूप घाम येते, ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता उद्भवू शकते. अशा परिस्थितीत व्यायामानंतर 1 ग्लास फळांचा रस प्या.

उन्हाळ्याच्या काळात दररोज एक वाटी दही खा. हे आपले शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवते. तसेच दहीचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

चहा, कॉफी सारख्या गरम पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका.

दर 1 ते 2 तासांनी पाणी पित राहा.

या सर्व मार्गांनी आपण शरीरात पाण्याची कमतरता पूर्ण करू शकता. याशिवाय शरीरातील पाण्याची कमतरता आयुर्वेदिक पद्धतींनीही पूर्ण होऊ शकते. उदाहरणार्थ, आपण गिलोयचा रस, बडीशेपेचं पाणी, मेथीचे पाणी अशा पेयांसह शरीरातील पाण्याच्या समस्येवर मात करू शकता. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असल्यानं आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपाय करा.

Web Title: Dehydration test : Check if you are drinking enough water with this dehydration test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.