Dark Underarms Treatment: उन्हाळा लागला की, घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे डिओड्रन्ट, परफ्यूम वापरतात. या गोष्टींनी घामाची दुर्गंधी तर दूर होते, पण त्वचेसंबंधी काही समस्या सुद्धा होतात. शरीराचा चांगला सुगंध यावा म्हणून हे प्रोडक्ट वापरणं फायदेशीर असलं तरी यानं शरीराचं व त्वचेचं नुकसानही होतं, ज्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात. डिओ किंवा परफ्यूमचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे अंडरआर्म्स म्हणजे काखेत काळपटपणा येणे.
नेहमीच परफ्यूम किंवा डिओ वापरल्यानं काखेतील त्वचा काळवंडते. त्यामुळे अनेक महिला स्लीव्हलेस ड्रेस घालू शकत नाहीत. कारण चारचौघात काळवंडलेली काख दिसणं योग्य वाटत नाही. तुम्हाला जर अशीच समस्या झाली असेल आणि यावर उपाय शोधत असाल तर हा लेख तुमच्या कामात पडू शकतो. डॉक्टरांनी ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
काय सांगतात एक्सपर्ट?
डर्मेटोलॉजिस्ट जुशिया सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, 'डिओड्रंट्स आणि परफ्यूमच्या सुगंधानं त्वचेचं नुकसान होतं. यातील केमिकलमुळे स्किन सेल्स जास्त रंग प्रोडक्शन करते आणि त्यामुळे अंडरआर्म्स डार्क दिसू लागतात'.
काय कराल उपाय?
डॉक्टरांनी सांगितलं की, काखेतील काळपटपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी डिओड्रंट आणि परफ्यूम वापरणं बंद करा. त्याऐवजी घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही बेंजोयल पॅराक्साइड साबणाचा वापर करू शकता.
तसेच तुमचे अंडरआर्म्स काळवंडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांनी अॅलोवेरा मॉइस्चरायजर्स लावण्याचा सल्ला दिला आहे. अॅलोवेरामध्ये व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ई सारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे स्किन लाइट आणि ब्राइट करण्यासाठी प्रभावी ठरतात.
तसेच डार्क स्किनची समस्या दूर करण्यासाठी कोजिक अॅसिड, अर्बुटिन आणि अॅजेलिक अॅसिडचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.
इतरही काही उपाय
- अंडरआर्म्स शेव्ह करु नका तर वॅक्सिंग करा. यामुळे काळे डाग पडत नाही आणि त्वचा मुलायम राहते.
- लिंबूची साल काखेत लावल्यानेही काळे डाग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्याठिकाणची मृत त्वचाही निघून जाण्यास मदत होते.
- काकडीमध्ये ब्लीचिंग एजंट असतात. काकडीच्या रसात थोडा लिंबूरस आणि हळद मिक्स करा. या पेस्टला ३० मिनिटं लावून ठेवा. हळूहळू रंग उजळण्यास मदत होईल.
- बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि त्याची हलकी पेस्ट बनवा. या पेस्टने काखेमध्ये स्क्रब करा. आठवड्यातून दोन वेळा याचा प्रयोग करा.