Lokmat Sakhi >Beauty > पाठीवर मुरुम ? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय...

पाठीवर मुरुम ? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय...

How to get rid of back acne fast, according to skin experts : How to Get Rid of Back Acne : पाठीवर येणारी पुरळ त्रासदायक, करा साधेसोपे घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 09:10 AM2024-07-10T09:10:00+5:302024-07-10T09:10:04+5:30

How to get rid of back acne fast, according to skin experts : How to Get Rid of Back Acne : पाठीवर येणारी पुरळ त्रासदायक, करा साधेसोपे घरगुती उपाय..

dermatologists tips on getting rid of back acne How to get rid of acne on the back How to get rid of back acne fast, according to skin experts | पाठीवर मुरुम ? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय...

पाठीवर मुरुम ? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय...

त्वचेशी संबंधित अनेक समस्या कधीकधी आपल्याला खूप त्रास देतात. त्वचेवर पुरळ, पिंपल्स येणे या त्वचेच्या सामान्य समस्या आहेत. या समस्येचा सामना  जवळजवळ प्रत्येकजणीने कधी ना कधी केला असेल. त्वचेची अनेक प्रकारे निगा राखूनही त्वचेच्या समस्या आपली साथ सोडत नाहीत. चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक कॉमन समस्या आहे.  परंतु पाठीवर पुरळ, पिंपल्स येणे या समस्येला अनेकींना तोंड द्यावे लागते(How to get rid of back acne fast, according to skin experts).

पाठीवर पिंपल्स अनेक कारणांमुळे होतात आणि ते दूर करण्यासाठी अनेक घरगुती (Natural Remedies for Back Acne) उपाय प्रभावी आहेत. या काही साध्या सोप्या उपायांचा वापर करुन आपण पाठीवरील बॅक एक्ने अगदी सहजरित्या घालवू शकतो. पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी, खार येथे डर्मेटोलॉजिस्ट कन्सलटंट म्ह्णून काम पाहणाऱ्या रैना नहार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे(dermatologists tips on getting rid of back acne).

बॅक एक्ने म्हणजे काय ?

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या बहुतेक महिलांना त्रास देते. चेहऱ्या प्रमाणेच पाठीवर मुरुम किंवा पुरळ येऊ शकतात. पाठीवर येणारे पुरळ ही देखील एक  सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे असू शकतात आणि हे चेहऱ्यावरील मुरुमांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. पाठीवरील पुरळ लहान किंवा मोठे असू शकतात. यामुळे जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि कधीकधी वेदना होतात. मात्र, उन्हाळ्यात या पुरळांचा जास्त त्रास होतो. पण, ही समस्या पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूतही उद्भवू शकते.

आंघोळ केल्यावर डोळे लालबुंद होतात ? ही असू शकतात कारणं, करा सोपे ४ उपाय... 

बॅक एक्ने येण्यामागची कारणं कोणती आहेत ? 

१. तज्ज्ञांच्या मते पाठीवर पुरळ अनेक कारणांमुळे येऊ शकतात.
२. घाम येणे आणि त्वचेत तेलाचे उत्पादन वाढल्याने मुरुम होऊ शकतात.
३. याशिवाय, PCOD आणि PCOS सारख्या आरोग्याच्या परिस्थितिमुळे होणारे हार्मोनल असंतुलन देखील पाठीच्या मुरुमांचे एक मुख्य कारण आहे.
४. पाठीवर जास्त घाम जमा झाल्यामुळेही पाठीवर पिंपल्स येऊ शकतात.
५. काहीवेळा व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ न केल्यास घाम साचून राहिल्याने असे होऊ शकते.
६. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैली हेही यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
७. कधीकधी हे विशिष्ट ऍलर्जीमुळे देखील होते.
८. दीर्घकाळ औषधे घेतल्याने किंवा कोणत्याही औषधाच्या दुष्परिणामांमुळेही असे होऊ शकते.
९. याशिवाय त्वचेच्या स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्याने देखील असे होऊ शकते. 

फेस वॅक्सिंग केल्यावर त्वचेची आग होते? ४ सोपे उपाय, जळजळ-रॅश हा त्रास होणार नाही...

कितीही मॉइश्चरायझर चोपडलं तरी स्किन ड्राय दिसते? पाहा ‘ही’ योग्य पद्धत, मिळेल मऊ त्वचा...

बॅक एक्ने घालविण्यासाठी घरगुती उपचार कोणते आहेत ?
 १. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर ती नियमितपणे स्वच्छ धुवा, यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो.
२. व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करून शरीर पूर्णपणे धुवा.  
३. बेंझॉयल पेरोक्साइड असलेले बॉडी वॉश वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण निघून जाते आणि पाठीवरचे पिंपल्स कमी होतात.
४. वैद्यकीयदृष्ट्या, हे मुरुम लेझर ट्रिटमेंटच्या मदतीने बरे केले जाऊ शकतात यामुळे जळजळ आणि डाग दूर होतात.
५. मुलतानी माती किंवा चंदनयुक्त बॉडी वॉशचा वापर करा. या दोन्ही गोष्टी मुरुमांमधील स्राव कमी करते आणि दाहक - विरोधी देखील आहे. तुम्ही चंदन किंवा मुलतानी मातीचा बॅक पॅक देखील वापरू शकता.

Web Title: dermatologists tips on getting rid of back acne How to get rid of acne on the back How to get rid of back acne fast, according to skin experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.