'केसगळती' ही केसांच्या संबंधित सर्वात कॉमन आणि सगळ्यांनाचं सतावणारी अशी एक मोठी समस्या आहे. केसांची योग्य ती वाढ होऊन केस छान घनदाट लांबसडक व्हावेत यासाठी आपण सतत अनेक उपाय करत असतो. जेव्हा केस खूप लवकर गळतात आणि नवीन केस येणं किंवा वाढणं थांबते तेव्हा त्याचा परिणाम म्हणून टक्कल पडू शकते. केसगळतीची ही समस्या कमी व्हावी म्हणून आपण ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करून पाहतो. पण केमिकल्स प्रॉडक्ट्सचा अतिवापर केसांसाठी हानिकारक ठरू शकते. यावर उपाय म्हणून आपण घरात नेहमी वापरले जाणारे अस्सल शुद्ध तूप आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर केसांच्या वाढीसाठी करु शकतो(Desi ghee and olive oil mixture: Can it help regrow hair).
केसांचे उत्तम आरोग्य आणि सौंदर्यासाठी तूप व ऑलिव्ह ऑईलचा वापर करणे फायदेशीर ठरते. केसगळतीची ही मोठी समस्या दूर करण्यासाठी तूप व ऑलिव्ह ऑईल यांचा एकत्रित वापर करणे केसांसाठी उपयुक्त ठरते. केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापरल्याने केसांची फक्त वाढ होण्यासच मदत होत नाही तर केस चमकदार आणि मऊ ठेवण्यास देखील मदत करते. यासोबतच तूप हे फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर केसांची मजबुती, केसगळती यांसारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यास मदत करते. केसांसाठी तूप आणि ऑलिव्ह ऑईल हे फायदेशीर तर असतं पण ते नेमकं वापरायचं कसं हे अनेकांना माहित नसते. यासाठी केसगळतीची ही कॉमन समस्या कमी करण्यासाठी तूप आणि ऑलिव्ह ऑईल यांचा वापर केसांवर कसा करावा याची योग्य पद्धत पाहूयात(Surprising Facts About Ghee & Olive Oil Benefits For Hair).
केसगळती कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय...
केसगळती कमी करण्यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून तूप आणि ऑलिव्ह ऑईल घेऊन ते चमच्याने मिक्स करून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण ३ ते ४ सेकंदांसाठी गॅसच्या मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावे. आता हे गरम करून घेतलेले मिश्रण केसांना लावण्यासाठी तयार आहे.
केसांसाठी कसे वापरावे ?
तूप व ऑलिव्ह ऑईल यांचे एकत्रित मिश्रण केसांना लावण्यापूर्वी केसांतील गुंता सोडवून केसांचे दोन भागात विभाजन करून घ्यावे. बोटांच्या मदतीने हे मिश्रण स्काल्पला लावून ५ ते १० मिनिटे बोटांनीच हळुहळु मसाज करून घ्यावा. त्यानंतर केसांना देखील हे मिश्रण लावून घ्यावे. हे मिश्रण तुम्ही केसांना ३० मिनिटे किंवा रात्रभर देखील लावून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी शाम्पू वापरुन केस स्वच्छ धुवून घ्यावे. कंडिशनर वापरून केसांचे कंडिशनिंग करुन घ्यावे. केसगळती कमी करण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय नक्की करावा.
रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!
तूप व ऑलिव्ह ऑईल केसांवर लावण्याचे फायदे...
१. रक्ताभिसरण वाढवते :- अस्सल घरगुती तूप आणि ऑलिव्ह ऑइलच्या एकत्रित मिश्रणाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. स्काल्पच्या त्वचेची छिद्र तूप आणि ऑलिव्ह ऑइल मधील सर्व आवश्यक पोषक घटक शोषून घेऊन केसांची वाढ होण्यास मदत करतात.
२. केसांच्या वाढीसाठी फायदेशीर :- तुपाचा वापर केल्याने केस मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते. तुपामध्ये अनेक गुणकारी घटक असतात. केसांना तूप लावल्याने केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
३. सखोल पोषण :- तूप आणि ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण केस आणि स्काल्पला कमालीचे पोषण देते. यासोबतच ते केसांना कंडिशनिंग करून केसांना अधिक मजबूत करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे केसांना हायड्रेट आणि मऊ ठेवण्यास उपयोगी ठरतात.
पांढरे केस आनंदाने मिरवणाऱ्या ६ बॉलिवूड अभिनेत्री, ना खोटे रंग-ना वय लपवण्याची धडपड!
४. हेल्दी स्काल्पसाठी :- केसांच्या वाढीसाठी स्काल्प हेल्दी असणे गरजेचे असते. तूप आणि ऑलिव्ह ऑईल या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याच्या नियमित वापराने, डोक्यातील कोंडा आणि कोरडेपणा यासारख्या परिस्थितीपासून आराम मिळतो, ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते.
५. केसांच्या मजबुतीसाठी :- तूप आणि ऑलिव्ह ऑइल यात फॅटी अॅसिडचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे केसांच्या कूपांना मजबूत करण्यास ते फायदेशीर ठरते. याचा नियमित वापर केल्याने केस तुटणे आणि गळणे यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.