डायबिटीसच्या रुग्णांनी नक्की काय खावे? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येक शुगर पेशंटला जाणून घ्यायचे असते (Diabetes Control Tips) खरं तर मधुमेह नियंत्रणात ठेवणे हे खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. मधुमेहावर कोणताही निश्चित इलाज नसला तरी आणि खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही, तर तुमची प्रकृती गंभीर होण्यापासून वाचू शकत नाही. (According to harvard health diabetes patient do not eat these 5 foods if they want controlled blood sugar level)
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रुग्णाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. (What is the best way to control diabetes naturally) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याच्या उपायांमध्ये प्रथम स्थान खाण्यापिण्याला आहे. (Diabetes prevention)
मधुमेह असलेल्या रुग्णांना ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त जास्त कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबी आहारात न खाण्याचा सल्ला दिला जातो. हार्वर्ड हेल्थनुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेही रुग्णांची स्थिती बिघडू शकते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी या गोष्टी खाणे टाळावे किंवा फार कमी प्रमाणात खाणे यातच चांगले आहे. (What is the best way to control diabetes)
नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल
कार्ब्सचे सेवन कमी प्रमाणात करा
जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट खाता, तेव्हा ते पौष्टिक-समृद्ध अन्न, जसे की भाज्या (विशेषत: पिष्टमय पदार्थ नसलेले) धान्य, फळे, शेंगा आणि दुग्धजन्य पदार्थ यांपासून आले पाहिजेत. प्रक्रिया केलेले पदार्थ, चरबी, साखर आणि सोडियम जास्त असलेले पदार्थ टाळा. कारण यातून मिळणारी कर्बोदके हानिकारक असतात.
सॅच्यूरेडेट फॅट्सचे सेवन कमी करा
मधुमेहाच्या रुग्णांनी सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करू नये किंवा कमी प्रमाणात करावे. हे प्रामुख्याने प्राण्यांपासून मिळवलेल्या उत्पादनांमध्ये आढळते. म्हणून गुड फॅट्सयुक्त पदार्थ देखिल मर्यादित प्रमाणात खायला हवेत.
गोड पदार्थ खाऊ नका
मधुमेहाच्या रुग्णांनी साखरयुक्त गोड पेये टाळावीत. उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप किंवा सुक्रोज असलेली मिठाई रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते. त्याऐवजी साधे पाणी प्यावे.
रात्री लवकर झोपच येत नाही? चांगल्या झोपेसाठी इफेक्टीव्ह ठरतील ५ टिप्स, १५ मिनिटांत ढाराढूर झोपाल
मीठाचं कमी सेवन
मिठाच्या अतिसेवनामुळे केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम होत नाही तर त्यामुळे अनेक गंभीर समस्या, विशेषत: हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढू शकतो. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे बळी असाल तर तुम्ही दररोज 2,300 मिलीग्रामपेक्षा कमी मीठ खावे.