Join us  

उन्हाने चेहरा काळवंडला? घरच्या घरी करा डायमंड फेशियल, पार्लरमध्ये पैसे खर्च न करता दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 8:05 PM

Diamond Facial At Home Beauty Tips : पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय...

आपला चेहरा नितळ आणि सुंदर दिसावा असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण काही ना काही कारणाने चेहरा काळवंडतो. चेहऱ्यावर फोड येतात, डाग पडतात. अशावेळी चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण एकतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट करतो किंवा बाजारात मिळणारी विविध सौंदर्यप्रसाधने लावून चेहऱ्यावरील डाग आणि काळेपणा झाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र या उपचारांनी तात्पुरता फरक पडत असला तरी कायमचा उपाय होत नाही. अशावेळी दिर्घकाळ टिकेल असा उपाय करणे आवश्यक असते. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताच खर्चही होत नसल्याने आर्थिकदृष्ट्याही हे आपल्या फायद्याचे असते. यासाठी काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे असते, त्या कोणत्या पाहूया (Diamond Facial At Home Beauty Tips)...

१. क्लिंजिंग 

बेसन पीठात दूध घालून त्याने चेहरा स्वच्छ करुन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावर असलेली घाण निघून जाण्यास मदत होते. 

२. स्क्रबिंग 

टोमॅटोची फोड घेऊन त्यावर साखर घालावी आणि त्याने चेहरा स्क्रब करावा. ५ मिनीटे हलक्या हाताने मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा, ब्लॅकहेडस निघून जाण्यास मदत होते.  

३. फेस मसाज

टोमॅटोच्या फोडीवर मध घालून त्याने किमान १० मिनीटे चेहऱ्याला मसाज करायला हवा.  

४. फेसपॅक

टोमॅटोची प्युरी, मुलतानी माती आणि तांदूळाची पिठी एकत्र करुन त्यामध्ये गुलाब पाणी घालून त्यापासून फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक १५ मिनीटांसाठी चेहरा आणि मानेला लावून ठेवावा. 

५. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पायरी म्हणजे चेहऱ्यावरुन बर्फाचे खडे फिरवावेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी