स्वयंपाक घरात काम करत असताना अनेकवेळा हातांना चटका किंवा भाजण्याची शक्यता असते. निष्काळजीपणा अथवा नकळतपणे आपल्या हातांना किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागांवर चटके बसतात. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना, कुकरची वाफ, चहा बनवताना, गरम तव्यावर हात लागल्याने किंवा गरम तेल शिंपडल्यामुळे अनेकदा चटका बसतो. चटका बसल्यानंतर अनेकडा फोड उठतो. कालांतराने त्या फोडात पाणी साठते. जेव्हा तो फोड फुटतो तेव्हा ती जळलेली त्वचा निघून जाते, तेव्हा आणखी वेदना होतात. काही चटक्यांचे डाग निघून जातात तर, काही तसेच राहतात. मात्र, चटका बसल्यानंतर त्वरित उपाय करावे. यासाठी काही घरगुती उपाय आपल्याला मदत करतील.
काही घरगुती उपाय जळलेल्या भागांवर देईल आराम
पाण्याने धुवा किंवा बर्फ लावा
चटका किंवा भाजल्यानंतर जळलेली त्वचा थंड पाण्याने धुवा. यामुळे संसर्गाचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. जळजळ कमी करण्यासाठी आपण त्वरित बर्फ देखील वापरू शकता, परंतु त्वचेवर बर्फ थेट लावण्याऐवजी कापडात गुंडाळा आणि बर्फ लावा. आपण बर्फाऐवजी आइस पॅकची देखील मदत घेऊ शकता.
खोबरेल तेल लावा
चटका बसल्यानंतर ती जागा पाण्याने धुवा. पाण्याने धुतल्यानंतर त्वचेला हलक्या हातांनी कोरडे करा आणि जळणाऱ्या जागेवर खोबरेल तेल लावा. हे केवळ जळजळ कमी करण्यास मदत करेल असे नाही, तर त्याच्या अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्मांमुळे जखम लवकर बरे होण्यास मदत होईल.
मधाचा करा असा वापर
आपण जळलेल्या जागेवर मधाचा वापर करू शकता. यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो. मधामध्ये अँटी-इन्फेक्शन, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म आढळतात, ज्याने जखमा लवकर बरे होतात.
कच्चे बटाट्याचे देईल आराम
त्वचा जळल्यानंतर त्यावर फोड येण्याची समस्या खूप सतावते. ही समस्या कमी करण्यासाठी आपण बटाट्याची मदत घेऊ शकता. यासाठी जळलेल्या जागेवर बटाटा मधोमध कापून हलक्या हातांनी त्वचेवर चोळा. आपण बटाट्याचा रस काढून जळणाऱ्या जागेवर लावू शकता. याने जळजळ कमी होईल.
कोरफड जेल लावा
त्वचेला पाण्याने धुतल्यानंतर ती कोरडी करा आणि त्यावर कोरफडीचे जेल लावा. त्यानंतर हलक्या हातांनी त्वचेवर चोळा. यामुळे त्वचेला थंडावा जाणवेल आणि जळजळ होण्याची समस्याही दूर होईल.