Lokmat Sakhi >Beauty > नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

Diet & lifestyle changes for stronger nails : नखांना निरोगी व मजबूत करण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा ३ बदल, नखांचे सौंदर्य येईल खुलून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 07:06 PM2024-08-12T19:06:20+5:302024-08-12T19:38:23+5:30

Diet & lifestyle changes for stronger nails : नखांना निरोगी व मजबूत करण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा ३ बदल, नखांचे सौंदर्य येईल खुलून...

Diet & lifestyle changes for stronger nails What To Eat for Healthy, Beautiful Nails | नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

आपले कपडे, केसांची हेअर स्टाईल, शरीराची व चेहेऱ्याची ठेवणं या सगळ्याचा आपण अतिशय काळजीपूर्वक विचार करुन त्यांची निवड करत असतो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना काही लहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. जसे की  आपल्या हातांची आणि पायांची नखे. हातांची आणि पायांची नखे चांगली असतील तर त्यामुळे हातांना आणि पायांना एक वेगळे सौंदर्य प्राप्त होत असते. सतत तुटणारी, रुक्ष झालेली नखे सगळ्यांनाच त्रासाची वाटतात. नखांना पुरेसे पोषण, आर्द्रता आणि काळजी घेतली नाही तर नखे रुक्ष होऊन तुटतात. अशा प्रकारच्या नखांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ती कमजोर दिसायला लागतात. आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी कुठल्याही पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. आपण घरच्या घरी देखील नखांची काळजी घेऊ शकतो(Nail Care Tips)

आपण आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतो. पण नखांची हवी तशी काळजी घेत नाही. नखांचे सौंदर्य देखील खूप महत्वाचे असते. यासाठी वेळोवेळी नखे कापणे, ती पॉलिश करणे, नेल पेंट लावणे आणि त्यांना चांगला आकार देणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. नखांची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असते. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या नाहीत तर नखं खराब होण्याची जास्त भीती असते. काहीवेळा नखांमधील ओलावा संपून ती रुक्ष होऊ लागतात, तर काहीवेळा ठिसूळ होऊन वारंवार तुटतात, असे होऊन नये म्हणून नखांची विशेष काळजी घ्यावी लागते. नखं मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे, यासाठी डाएट (Foods You Should Eat If You Want Strong, Healthy Nails) आणि लाईफस्टाईलमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते. दिल्लीच्या इक्साना वेलनेसच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपराजिता लांबा यांनी नखांची योग्य ती काळजी घेण्यासाठी डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये नेमके कोणते बदल करावेत हे सांगितले आहे, ते पाहूयात(Diet & lifestyle changes for stronger nails).

१. नखांच्या चांगल्या आरोग्यासाठी डाएटमध्ये कोणते बदल करावेत ? (What foods make your nails stronger?)

१. नखांची मजबुती आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त डाएट घ्यावे. प्रोटिन्स नखांच्या मजबुतीसाठी एक आवश्यक पोषक घटक आहे, कारण नख ही 
केरोटीन नामक प्रोटिन्सनी बनलेली असतात. यासाठी डाएटमध्ये दुग्धजन्य पदार्थ, टोफू, सोयाबीन, डाळी यांचा आहारात समावेश करावा.  

२. लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 'ए' यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजांनीयुक्त हिरव्या पालेभाज्या खाणे निरोगी नखांसाठी आवश्यक असते. त्यामुळे पालक आणि ब्रोकोली यासारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. 

३. नखे मजबूत आणि निरोगी करण्यासाठी, तुम्ही फॅटी ॲसिड, बायोटिन यासारखी पोषक तत्वे असणारे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. बदाम, अक्रोड आणि काजू यांसारख्या इतर पोषक तत्वांनी युक्त सुका मेवा रोज खावा. 

१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...

२. नखांच्या चांगल्या आरोग्यासाठी लाइफस्टाइल मध्ये कोणते बदल करावेत ?

१. नखांना जेल पॉलिश किंवा ऍक्रेलिक पॉलिश यांसारख्या ट्रिटमेंट्स वारंवार करणे टाळा. कारण या ट्रिटमेंट्समुळे नखांची मुळे कमकुवत आणि नुकसान होऊ शकते, ज्यामुळे नखे तुटण्याची शक्यता वाढते. 

२. नख कायम कोरडी ठेवा ओल्या नखांवर इन्फेक्शन्स होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे नखं कोरडी ठेवावीत. 

३. नखांना जास्त पॉलिश करणे टाळा, कारण जास्त पॉलिश केल्याने नखांचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर कमकुवत होतो, ज्यामुळे तुमची नखे कमकुवत होऊ शकतात.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी टूथपेस्टमध्ये मिक्स करा फक्त ४ पदार्थ, दात होतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र... 

Web Title: Diet & lifestyle changes for stronger nails What To Eat for Healthy, Beautiful Nails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.