Lokmat Sakhi >Beauty > अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी? आहारात घ्या ५ पदार्थ...बघा नितळ त्वचेची जादू...

अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी? आहारात घ्या ५ पदार्थ...बघा नितळ त्वचेची जादू...

Diet Tips for Glowing Skin : त्वचा नितळ आणि सुंदर दिसावी यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 12:52 PM2022-07-10T12:52:44+5:302022-07-10T12:57:44+5:30

Diet Tips for Glowing Skin : त्वचा नितळ आणि सुंदर दिसावी यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी...

Diet Tips for Glowing Skin : Want glowing skin like actresses? Eat 5 foods ... see the magic of smooth skin ... | अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी? आहारात घ्या ५ पदार्थ...बघा नितळ त्वचेची जादू...

अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी? आहारात घ्या ५ पदार्थ...बघा नितळ त्वचेची जादू...

Highlightsसूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी टोमॅटोचा अतिशय चांगला उपयोग होतो. आहाराकडे योग्य पद्धतीने लक्ष दिल्यास तब्येत तर चांगली राहतेच पण सौंदर्यही चांगले राहण्यास मदत होते

आपली त्वचा नितळ, ग्लोइंग आणि फेअर असावी असं प्रत्येकीला कायम वाटतं. पण कधी प्रदूषणामुळे तर कधी आहारातील चुकीच्या पद्धतींमुळे त्वचा खराब होते. त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही किंवा त्वचेचे म्हणावे तसे पोषण झाले नाही तर त्वचेवर डाग येणे, त्वचा सुरकुतणे, फोड, पिंपल्स येणे अशा समस्या उद्भवतात. आपण जे खातो त्याचा आपली त्वचा, केस, शरीरबांधणी यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या आहाराचा आरोग्य आणि सौंदर्याचा जवळचा संबंध असतो हे लक्षात घ्यायला हवे (Skin Care Tips). त्यामुळे केवळ ब्यूटी प्रॉडक्टस वापरुन किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट करुन उपयोग होत नाही, तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करावा लागतो. अभिनेत्री इतर गोष्टींबरोबरच आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत असल्याने त्यांची त्वचा कायम ग्लोइंग दिसते. पाहूयात त्वचा नितळ आणि सुंदर दिसावी यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा (Diet Tips for Glowing Skin). 

(Image : Google)
(Image : Google)

१. आक्रोड 

आक्रोड हा सुकामेव्यातील एक महत्त्वाचा घटक. मात्र आपण काजू, बदाम, मनुके किंवा पिस्ते सामान्यपणे खातो. पण आक्रोड मात्र तितके खात नाही. आक्रोड काहीसे महाग असल्याने आणि त्याची चव थोडीशी वेगळी असल्याने आक्रोड खाणे टाळले जाते. पण आक्रोडात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असल्याने आहारात आक्रोड आवर्जून घ्य़ायला हवेत. केक, चॉकलेट, कुकीज, लाडू यामध्ये आपण आक्रोडाचा अवश्य उपयोग करु शकतो. तसेच चेहऱ्याला आक्रोडाचे तेल लावणेही आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

२. रताळे 

रताळे हे बाजारात सहज मिळणारे कंदमूळ आहे. आपण साधारणपणे उपवासाला रताळी खातो. मात्र एरवीही बटाट्यापेक्षा रताळी खाणे जास्त फायद्याचे असते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. रताळ्यामुळे पचनाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रताळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. म्हणून रताळ्यांचा चांगल्या त्वचेसाठी आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

३. टोमॅटो 

टोमॅटोत व्हिटॅमिन सी, क, ई, ए मुबलक प्रमाणात असतात. या सर्व व्हिटॅमिन्सचा त्वचेला अतिशय चांगला फायदा होतो. त्वचा उजळ करण्यास टोमॅटोमध्ये अतिशय उपयुक्त गुणधर्म असतात. टोमॅटो त्वचेवर सनस्क्रीन म्हणून उत्तम काम करते. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी टोमॅटोचा अतिशय चांगला उपयोग होतो. म्हणून आहारात आणि त्वचेवर लावण्यासाठी टोमॅटोचा आवर्जून वापर करावा. 

(Image : Google)
(Image : Google)

केसांना तेल लावताना हमखास होणाऱ्या 6 चुका, तेल चोपडूनही केस होतात खराब

४. डार्क चॉकलेट 

डार्क चॉकलेट अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत मानले जाते. अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. चॉकलेट तर आपल्या सगळ्यांनाच खायला आवडते. त्यामुळे डार्क चॉकलेटचे आईस्क्रीम, केक अशा गोष्टी आपण नक्की खाऊ शकतो. याशिवाय चेहऱ्याला डार्क चॉकलेटचे फेशियल केले तर त्याचाही चांगला फायदा होतो आणि त्वचा ग्लो करण्यास मदत होते. 

५. सूर्य़फूल बिया 

सूर्यफुलाच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, खनिजे आणि फॅटी अॅसिडस असतात, ज्यामुळे त्वचेचे पोषण होण्यास मदत होते. त्वचा मऊ आणि निरोगी राहण्यासाठी याचा चांगला उपयोग होत असल्याने सूर्यफुलांच्या बियांचा आहारात समावेश करायला हवा. 

Web Title: Diet Tips for Glowing Skin : Want glowing skin like actresses? Eat 5 foods ... see the magic of smooth skin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.