Lokmat Sakhi >Beauty > बदाम भिजवून खाता, साल फेकून देता? त्यापासून बनवा- खास हेअरपॅक-स्क्रब-नाइटक्रीम 

बदाम भिजवून खाता, साल फेकून देता? त्यापासून बनवा- खास हेअरपॅक-स्क्रब-नाइटक्रीम 

बदामाची सालं (almond peels) काढून बदाम खाणं फायदेशीर असतं हे मान्य पण म्हणून बदामाच्या सालांचा काहीच उपयोग होत नाही (benefits of almond peels) असं नाही. बदामाची सालं फेकून न देता त्यापासून स्क्रब, हेअरपॅक आणि नाइटक्रीम ही (beauty products from almond peels) सौंदर्य प्रसाधनं तयार करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 04:24 PM2022-06-27T16:24:13+5:302022-06-27T16:25:55+5:30

बदामाची सालं (almond peels) काढून बदाम खाणं फायदेशीर असतं हे मान्य पण म्हणून बदामाच्या सालांचा काहीच उपयोग होत नाही (benefits of almond peels) असं नाही. बदामाची सालं फेकून न देता त्यापासून स्क्रब, हेअरपॅक आणि नाइटक्रीम ही (beauty products from almond peels) सौंदर्य प्रसाधनं तयार करता येतात.

Different ways to use almond peels for beauty. 3 Beauty products from almond peels | बदाम भिजवून खाता, साल फेकून देता? त्यापासून बनवा- खास हेअरपॅक-स्क्रब-नाइटक्रीम 

बदाम भिजवून खाता, साल फेकून देता? त्यापासून बनवा- खास हेअरपॅक-स्क्रब-नाइटक्रीम 

Highlightsबदामाच्या सालांमध्ये जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टसही असतात. हे घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

बदाम खाण्याची आरोग्यदायी पध्दत म्हणजे बदाम भिजवणं आणि त्याची सालं काढून खाणं. या पध्दतीनं बदाम खाणं सुरक्षित मानलं जातं. कारण बदामाच्या सालांमध्ये फाइटिक ॲसिड नावाचं शरीरास घातक रसायन असतं. बदामाची सालं (almond peels)  काढून बदाम खाणं फायदेशीर असतं हे मान्य पण म्हणून बदामाच्या सालांचा काहीच उपयोग (benefits of almond peels)  होत नाही असं नाही.  बदामाची सालं फेकून न देता त्यापासून सौंदर्य प्रसाधनं तयार करता येतात. बदामाच्या सालांपासून (beauty products from almond peels)  स्क्रब, नाइटक्रीम आणि हेअर पॅक तयार करता येतात. 


बदामाच्या सालामध्ये फायटिक ॲसिड असतं म्हणून ते पोटात जावू नये ही काळजी घेणं आवश्यक असतं. पण असं असलं तरी बदामाच्या सालांमध्ये जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टसही असतात. हे घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यापासून सौंदर्य उत्पादनं तयार करता येतात. 

Image: Google

फेस स्क्रब

बदामाच्या सालांमध्ये त्वचेचा पोत सुधारणारे गुणधर्म असतात. त्यामुळे बदामाच्या सालापासून स्क्रब तयार करता येतं. स्क्रब तयार करण्यासाठी 1 कप बदामाची सालं उन्हात सुकवून घ्यावी.  सुकलेली सालं अर्धा कप रोल्ड ओट्स,अर्धा कप बेसन आणि अर्धा कप काॅफीसोबत वाटून घ्यावी. या सर्वांचं जाडसर मिश्रण तयार करावं. ही जाडसर पावडर हवाबंद डब्यात भरुन ठेवावी.  जेवढी हवी असेल तेवढी पावडर घ्यावी. त्यात दही घालून ती एकजीव करावी. ही पावडर चेहेऱ्यास लावावी. चेहेऱ्यावरील डाग घालवण्यासाठी बदामाच्या सालीचं हे फेस स्क्रब फायदेशीर असतं. 

हेअरपॅक

केस मऊसूत होण्यासाठी बदामाच्या सालींचा हेअरपॅक तयार करता येतो. हा हेअरपॅक तयार करण्यासाठी अर्धा कप बदामाची सालं, 1 मोठा चमचा खोबऱ्याचं तेल, 2 मोठे चमचे कोरफड जेल आणि मध घालावं. हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावं. नंतर गाळणीनं ते गाळून घ्यावं. या हेअरपॅकमध्ये ई जीवनसत्वं भरपूर असतं. त्यामुळे हा हेअरपॅक  हेअर स्पा सारखा काम करतो. 

Image: Google

नाइटक्रीम

बदामाच्या सालांपासून नाइट क्रीमही तयार करता येतं. या नाइटक्रीममुळे त्वचेवरील सुरकुत्या, काळे डाग निघून जातात. त्वचेतील पेशी दुरुस्त होतात. बदामाची सालं मिक्सरमधून बारीक करुन घ्यावी.  या पावडरमध्ये कोरफड जेल, साय, ऑलिव्ह तेल घालून हे सर्व जिन्न्स चांगलं एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण छोट्या डब्यात भरुन ठेवावं. ही नाइटक्रीम फ्रिजमध्ये ठेवली तरी चालते. रात्री झोपण्याआधी चेहेरा स्वच्छ धुवून रुमालानं टिपून घ्यावा आणि चेहेऱ्याला ही नाइटक्रीम लावावी.  
 

Web Title: Different ways to use almond peels for beauty. 3 Beauty products from almond peels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.