आपल्या शरीराला आराम मिळाला की आपल्याला पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते, शरीरात चैतन्य निर्माण होतं. तसंच चेहेऱ्याच्या त्वचेचंही आहे. चेहेऱ्याच्या त्वचेलाही आराम हवा असतो. तो आराम मिळाला तर त्वचा सतेज दिसते, उजळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचा तरुण राहाते. पण त्वचेला आराम द्यायचा म्हणजे काय करायचं? याचं उत्तर 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) देते. तिने आपल्या यू ट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून चेहेऱ्याची त्वचा रीलॅक्स करण्याची पध्दत सांगितली आहे. दीपिका कक्करने सांगितलेली पध्दत जपानी तनाका मसाज (tanaka massage) नावानं ओळखली जाते. जपानी महिलांच्या चमकदार त्वचेचं रहस्य (Japanese women glowing skin secret) म्हणजे हा तनाका मसाज आहे. या पध्दतीनं चेहेऱ्याला मसाज केल्यानं त्वचेतील सर्व विषारी घटक ( benefits of tanaka massage) बाहेर पडतात. त्वचा सतेज आणि उजळ दिसते. आपली त्वचा कायम तरुण दिसण्यासाठी हा 8 स्टेप्सचा तनाका मसाज कसा (how to do tanaka massage step by step) करावा हे दीपिका कक्करनं आपल्या यू ट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
Image: Google
तनाका मसाज स्टेप बाय स्टेप
स्टेप 1
जपानी पध्दतीचा तनाका मसाज करण्याआधी दोन्ही हात एकमेकांवर घासून गरम करावे. मग या गरम हातांनी चेहेरा चोळावा. याला स्टेप वन च्या आधी चेहेरा वाॅर्म अप करणं म्हणतात. चेहेरा वाॅर्म अप झाला की मग तनाका मसाज स्टेप बाय स्टेप करावा. दोन्ही हात कानाच्या जवळ न्यावेत. दोन्ही हातांनी कानाच्या जवळ हलकं दाबावं. असं हलकं हलकं दाबत हात कानापासून मानेपर्यंत न्यावे. मानेपासून खांद्यापर्यंत हातानं दाब देत जावं. या भागात लसिका ग्रंथी असात. लसिका ग्रंथी असतात. त्यांचा मसाज झाल्यानं त्या उद्दीपीत होतात आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. कानापासून खांद्यापर्यंतच्या भागाचा मसाज करताना हे स्टेप तीन ते पाच वेळा करावी.
स्टेप 2
दोन्ही हात कपाळाच्या मध्यभागी ठेवावे. तिथे हातानं दाब द्यावा. कपाळाच्या मधोमध दाब देत हात हळूहळू खाली आणावे. मग डोक्याच्या दोन्ही बाजूंनी दाब द्यावा. आणि परत हातानं दाब देत देत खांद्यापर्यंत लसिका ग्रंथींजवळ न्यावे. पहिली स्टेप जेवड्या वेळा केलीत तेवढ्याच वेळा ही दुसरी स्टेप करावी.
स्टेप 3
दोन्ही हात डोळ्यांच्या टोकाशी ठेवावे. तिथून हात हळू ह्ळू गोल गोल फिरवत नाकपुड्यापर्यंत न्यावे. तिथे हातानं दाबावं. पुन्हा हात भुवयांकडे न्यावेत आणि तिथून हातानं दाबत दाबत खांद्यापर्यंत मसाज करावा.
Image: Google
स्टेप 4
चौथ्या स्टेपमध्ये त्वचा वरती ढकलायची आहे . यासाठी दोन्ही हात हनुवटीवर ठेवून त्वचा वर वर ढकलावी. 3 ते 4 सेकंद या पध्दतीनं मसाज करावा. पुन्हा हात कपळापासून दाबत दाबत खांद्यपर्यंत मसाज करावा.
स्टेप 5
पाचव्या स्टेपमध्ये नाकाच्या दोन्ही बाजूंनी मसाज करत म्ग नाकावर मसाज करावा. नाकावर मसाज केल्यानंतर् दोन्ही हात कपाळाच्या मधोमध ठेवून हातानं दाबत दाबत खांद्यापर्यंत मसाज करावा.
स्टेप 6
दोन्ही गालांवर हात गोलाकार फिरवत मसाज करावा. गालाचा मसाज केल्यानंतर डोळ्यांच्या बाजूनं मसाज करावा. डोळ्यांचा बाजूचा मसाज झाला की हात गालावरुन खाली दाबत दाबत खांद्यापर्यंत आणावेत. तीन वेळा गालाचा, डोळ्याच्या बाजूचा असा मसाज केल्यानंतर हातावर एक गाल टेकवावा. आणि दुसऱ्या गालावर हात घासत मसाज करावा. दोन्ही गालांवर तीन तीन वेळा या पध्दतीनं मसाज करावा.
Image: Google
स्टेप 7
कपळापासून गालापर्यंत मसाज झाला की मग हनुवटीचा मसाज करावा. दोन्ही हात हनुवटीवर ठेवून वरच्या दिशेनं दाब द्यावा. यामुळे त्वचा वर ढकलली जाते. 3 सेकंद हात असेच हनुवटीला वर उचलून धरावेत. नंतर कपाळाच्या दोन्ही बाजुंनी दाब देत खांद्यापर्यंत खाली आणावेत. तीन वेळा अशा पध्दतीनं मसाज केल्यानंतर हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी हनुवटीचा भाग दाबून धरावा आणि बोटं डोळ्यांजवळ घेऊन जावेत. अंगठ्यांनी हनुवटी दाबून धरत डोळ्यांंच्या आणि भुवयांच्या भोवताली मसाज करावा. नंतर दोन्ही हातांनी कपाळाच्या बाजूनं दाब देत हात खाली दाबत खांद्यापर्यंत आणावेत.
स्टेप 8
शेवटच्या स्टेपमध्ये दोन्ही हात कपाळावर गोल गोल फिरवत कपाळाचा मसाज करावा. अशा पध्दतीनं हा तनाका मसाज आठ स्टेजमध्ये पूर्ण होतो. हातानं जोरदार दाबत चेहेऱ्यापासून खांद्यापर्यंत मसाज केला जातो. हा मसाज नियमित केल्यास त्वचा सैल पडत नाही. त्वचेचा घट्टपणा टिकून राहातो. चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. तसेच चेहेऱ्याच्या त्वचेला आराम मिळून त्वचा प्रफुल्लित होतो.
Image: Google
तनाका मसाज आहे तरी काय?
जपानी पध्दतीचा तनाका मसाज म्हणजे कोणत्याही क्रीम, लोशन किंवा तेलाशिवाय केला जाणारा मसाज आहे. युकुको तनाका या जपानी महिलेने या मसाजची ही पध्दत विकसित केल्यानं या मसाजला तनाका मसाज असं म्हटलं जातं. या मसाजनं चेहेऱ्याच्या त्वचेच्या ग्रंथी उद्दीपित होतात. लसिका ग्रंथी उद्दीपित होतात. या प्रकारच्या मसाजनं चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. चेहेऱ्याची सूज कमी होते.