ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी होम रेमेडीज सोबतच महिला अनेक प्रकारचे फेशियल करतात. असाच एक प्रभावी फेशियल म्हणजे आइस वॉटर फेशियल. तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी महिला अनेकदा फेशियल करून घेतात. पण पार्लरमधील हे फेशियल खर्चिक ठरते. तसंच यातील केमिकलयुक्त क्रिम्सचा देखील कधी कधी वाईट परिणाम होत असतो. त्वचेला नुकसानही पोहचते. आपल्याला जर नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरील उजळपणा वाढवायचा असेल, चेहऱ्यावर तजेलदारपणा हवा असेल तर सध्या आइस वॉटर फेशियल खूपच ट्रेंडमध्ये आहे. बर्फाच्या थंड पाण्याने तोंड धुणे असाच काहीसा हा प्रकार आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हे धोक्याचेच ठरू शकते. आइस वॉटर फेशियल वापरण्याचा ट्रेंड असला तरीही, योग्य पद्धतींचा अवलंब न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. आइस वॉटर फेशियल करावे की करू नये याबद्दल डरमॅटोलॉजिस्ट यांचे काय मत आहे, ते समजून घेऊयात(Dipping Face In Ice-Cold Water, Ice Water Facial : Does It Help Improve Your Skin?).
डरमॅटोलॉजिस्ट काय म्हणत आहेत...
१. बऱ्याच महिला सध्या झटपट ग्लोइंग स्किन मिळविण्यासाठी आईस वॉटर फेशियलचा वापर करताना दिसतात परंतु या आईस वॉटर फेशियलमुळे आपल्या स्किनला एक वेगळ्याच प्रकारचा इन्स्टंट ग्लो प्राप्त होतो. याचा वापर केल्याने आपली स्किन ग्लोइंग होऊन तजेलदार आणि फ्रेश होते. परंतु आइस वॉटर फेशियल वारंवार स्किनवर वापरणे धोकादायक ठरु शकते. आइस वॉटर फेशियलचा वापर करत असताना त्याचे आपल्या स्किनवर होणारे वाईट परिणाम काय आहेत त्याबद्दल डरमॅटोलॉजिस्ट अंकुर सरीन सांगतात, आइस वॉटर फेशियलचा वापर करत असताना त्यामागे एक सोपे वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा आपण कोणतीही थंड गोष्ट जसे की बर्फ आपल्या स्किनवर लावतो तेव्हा आपल्या नसा त्या आकुंचन पावतात. या नसा आकुंचित झाल्यामुळे त्यांचा आकार लहान होतो. यामुळे आपल्या चेहेऱ्यावरील सूज (पफीनेस) कमी होईल, डोळ्यांखालची काळी वर्तुळे निघून जातील, ओपन पोर्सदेखील कमी होतील आणि आपला चेहेरा ग्लोइंग दिसण्यास मदत होते. चेहेऱ्यात होणारे हे सगळे बदल कायमस्वरुपी नसून तात्पुरते असतात. आईस वॉटर फेशियल केल्याने वरील फायदे स्किनला होतात परंतु चेहऱ्यातील बदल हे पुढील २० ते ३० मिनिटांपर्यंतच मर्यादित असतात.
२. आपण जर वारंवार या आइस वॉटर फेशियलचा वापर करत असाल तर गार पाण्याच्या थंडाव्याने आपल्या स्किनमधील नसांना इजा होऊन त्या मृत होण्याची शक्यता असते. याचबरोबर बाहेरून स्किन खराब होऊ शकते. वरचेवर आईस वॉटर फेशियल वापरत असाल तर त्याचा फायदा होण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम हळुहळु चेहेऱ्यावर दिसून येतील. त्यामुळे एक डर्मेटोलॉजिस्ट म्हणून आईस वॉटर फेशियल सारखे सारखे करणे चेहेऱ्याला घातक ठरू शकते. त्याचबरोबर हे करण्याव्यतिरिक्त आपण जे डेली स्किन केअर रुटीन फॉलो करतो तेच नॉर्मल व आपल्या स्किनला सूट होणारे रुटीन फॉलो करण्याचा सल्ला डरमॅटोलॉजिस्ट देतात.
drankursarin_sarinskin या इंस्टाग्राम पेजवरून डरमॅटोलॉजिस्ट अंकुर सरीन यांनी आइस वॉटर फेशियल बद्दलचे त्यांचे मत व्यक्त केले आहे.
आइस वॉटर फेशियलचे साइड इफेक्ट :-
१. थंड पाणी तुमच्या पोर्सला टाइटन करते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि त्वचेत घाण अडकू शकते.
२. जर पाणी थंड असेल तर यामुळे त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते.
३. बर्फाचे तुकडे थेट चेहऱ्यावर लावू नका. याशिवाय चेहऱ्याच्या कोणत्याही विशिष्ट भागावर एक मिनिटापेक्षा जास्त वेळ बर्फाचा खडा ठेवू नका.
४. डोळ्यांजवळील भाग हा अतिशय नाजूक व संवेदनशील असतो त्यामुळे डोळ्यांजवळील भागांवर बर्फ लावताना काळजी घ्यावी.
५. तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये आइस फेशियलचा समावेश करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणाकडूनही ऐकल्यानंतर किंवा एखाद्याला असे करताना पाहिल्यानंतर स्वतःहून आइस फेशियल कार्याला जाऊ नका.
६. बर्फाचा तुकडा स्किनवर चोळल्याने स्किनवरील लहान छिद्रांना इजा होऊ शकते.