Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात सतत आइस वॉटर फेशियल करताय? थांबा, त्वचेवर होतील ५ गंभीर परिणाम, चेहरा सांभाळा..

उन्हाळ्यात सतत आइस वॉटर फेशियल करताय? थांबा, त्वचेवर होतील ५ गंभीर परिणाम, चेहरा सांभाळा..

Dipping Your Face Regularly In Ice Water Can Damage Skin Texture : उन्हाळ्यांत वारंवार आईस वॉटर फेशियल करणे त्वचेच्या आरोग्यासाठी घातकच ठरु शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 03:25 PM2023-03-15T15:25:38+5:302023-03-15T15:42:29+5:30

Dipping Your Face Regularly In Ice Water Can Damage Skin Texture : उन्हाळ्यांत वारंवार आईस वॉटर फेशियल करणे त्वचेच्या आरोग्यासाठी घातकच ठरु शकते.

Dipping Your Face Regularly In Ice Water Can Damage Skin Texture | उन्हाळ्यात सतत आइस वॉटर फेशियल करताय? थांबा, त्वचेवर होतील ५ गंभीर परिणाम, चेहरा सांभाळा..

उन्हाळ्यात सतत आइस वॉटर फेशियल करताय? थांबा, त्वचेवर होतील ५ गंभीर परिणाम, चेहरा सांभाळा..

आपण सगळेच आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. त्यातही आपण आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेची अधिकच जास्त काळजी घेतो. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेताना प्रत्येकाचे काही ना काही स्किन केअर रुटीन ठरलेले असते. त्वचा नितळ, चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी विविध प्रकारचे फेशियल, फेस मास्क आणि सौंदर्य उत्पादने वापरली जातात. उन्हाळ्यात, त्वचा चांगली राहण्यासाठी व उष्णतेच्या अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी काहीजणी बर्फाचे पाणी किंवा बर्फाचा वापर करतात. चेहऱ्यावर बर्फ वापरण्याला आइस वॉटर फेशियल असे म्हणतात. आईस वॉटर फेशियल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या वापराने आपल्या त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहऱ्यावर चमकही येते.

आइस वॉटर फेशियल केल्याने आपल्या त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि ताणतणाव दूर होतो. परंतु कधीकधी चुकीच्या पद्धतीने आईस वॉटर फेशियल केल्याने आपल्या त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. आपल्यापैकी काहीजण उन्हाळ्यांत त्वचेला थंडावा मिळण्यासाठी वारंवार आईस वॉटर फेशियल करतात. यामुळे आपल्या चेहऱ्याला काही काळासाठी आराम मिळेल. परंतु वारंवार आईस वॉटर फेशियल करणे त्वचेच्या आरोग्यासाठी घातकच ठरु शकते. आईस वॉटर फेशियल करताना काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर आपली त्वचा खराब होऊ शकते(Dipping Your Face Regularly In Ice Water Can Damage Skin Texture).

आईस वॉटर फेशियल करतांना नक्की काय काळजी घ्यावी... 

१. स्किन इरिटेशनची समस्या :- 

आईस वॉटर फेशियल करताना, जर आपण थेट चेहऱ्यावर किंवा त्वचेवर बर्फाचा खडा फिरवल्यास आपल्याला जळजळ होण्याची शक्यता असते. याशिवाय बर्फ थेट त्वचेवर लावल्याने त्वचेला जळजळ होऊन स्किन इरिटेशन होऊ शकते. स्किन इरिटेशनची समस्या टाळण्यासाठी बर्फाचा खडा कापसात किंवा स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या रुमालात बांधून मग त्याने मसाज करावा. याशिवाय चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर संपूर्ण चेहेरा पुन्हा एकदा नॉर्मल पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावा. 

२. त्वचेला बॅक्टेरियल इंन्फेक्शनचा संसर्ग होण्याची शक्यता :- 

जर आपण चेहरा न धुता थेट आईस वॉटर फेशियल केले तर त्यामुळे चेहऱ्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. चेहेरा स्वच्छ न धुता चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने चेहऱ्यावरील घाण व बॅक्टेरिया त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकतात. यामुळे, त्वचेला बॅक्टेरियल इंन्फेक्शन संसर्गाचा धोका असतो. आईस वॉटर फेशियल करण्याआधी, चेहरा नीट स्वच्छ धुवून घेतल्यास बॅक्टेरियल इंन्फेक्शनचा संसर्ग होण्यापासून आपण रोखू शकतो.   

३. अतिसंवेदनशील त्वचेसाठी हानिकारक :- 

ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील आहे त्यांच्यासाठी आईस वॉटर फेशियल खूप हानिकारक ठरु शकते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांच्या त्वचेला बर्फाच्या घनतेमुळे तसेच थंडाव्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांना त्वचेची जळजळ किंवा रॅशेस, लाल पुरळ येणे यांसारख्या त्वचेसंबंधीत तक्रारींना सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी जर दररोज आईस वॉटर फेशियल केले तर यामुळे त्यांना स्किन इरिटेशन होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

बर्फाच्या पाण्याचे फेशियल सतत कराल तर पस्तावाल! इन्स्टंट ग्लोच्या नावाखाली आइस वॉटर फेशियलचा भलताच परिणाम...

४. त्वचेच्या रक्त प्रवाहावर परिणाम होऊ शकतो :- 

आईस वॉटर फेशियलमुळे आपल्या त्वचेतील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आईस वॉटर फेशियल करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. जर आपल्याला आधीच त्वचेशी संबंधित कोणताही आजार किंवा समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आईस वॉटर फेशियल करु नका. 

५. त्वचेवर ओरखडे पडण्याची भीती :- 

आईस वॉटर फेशियल करताना आपण थोडी खबरदारी पाळली पाहिजे. जर आपण बर्फाच्या पाण्याचे फेशियल अतिशय कठोर पद्धतीने केले तर त्यामुळे आपली त्वचा कापली जाऊ शकते, त्वचा सोलण्याची भीती देखील असते. त्याचबरोबर त्वचेवर ओरखडेसुद्धा येऊ शकतात. यामुळे आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आईस वॉटर फेशियल करताना चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Web Title: Dipping Your Face Regularly In Ice Water Can Damage Skin Texture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.