Lokmat Sakhi >Beauty > मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? चेहऱ्याला होईल इन्फेक्शन, टॉयलेट सीटपेक्षा असतात जास्त बॅक्टेरिया...

मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? चेहऱ्याला होईल इन्फेक्शन, टॉयलेट सीटपेक्षा असतात जास्त बॅक्टेरिया...

Study Shows Makeup Brushes Hold More Bacteria Than a Toilet Seat : एका संशोधनात असे आढळून आले आहे की मेकअप केल्यानंतर ब्रशेस स्वच्छ न केल्यास त्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण खूप जास्त वाढते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 06:27 PM2023-04-15T18:27:44+5:302023-04-15T18:39:21+5:30

Study Shows Makeup Brushes Hold More Bacteria Than a Toilet Seat : एका संशोधनात असे आढळून आले आहे की मेकअप केल्यानंतर ब्रशेस स्वच्छ न केल्यास त्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण खूप जास्त वाढते.

Dirty Makeup Brushes Have More Bacteria Than A Toilet Seat | मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? चेहऱ्याला होईल इन्फेक्शन, टॉयलेट सीटपेक्षा असतात जास्त बॅक्टेरिया...

मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? चेहऱ्याला होईल इन्फेक्शन, टॉयलेट सीटपेक्षा असतात जास्त बॅक्टेरिया...

मेकअप करायचा म्हटलं की मेकअप करण्यासाठी मेकअप ब्रश हा लागतोच. मेकअप करताना ब्रश वापरल्याने मेकअप छान व्यवस्थित होतो. मेकअप ब्रशमुळे मेकअप सर्वत्र एकसारखाच पसरतो. मेकअप करताना तुम्ही कितीही महागडी प्रोडक्ट्स वापरली तरी ती चेहऱ्यावर नीट ब्लेंड करण्यासाठी हवे असतात चांगले ब्रश. चेहऱ्यावरील लावली जाणारी विविध प्रोडक्ट्स एकमेकांमध्ये योग्य तऱ्हेने ब्लेंड करून चेहऱ्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी हे ब्रश खूप आवश्यक असतात.

मेकअप करताना बोटाऐवजी ब्रशेसचा वापर अनेक कारणांनी उपयुक्त ठरतो. ब्रशने केलेला मेकअप हा इव्हन आणि पॉलिश्ड लुक देतो आणि हायजिनिकही असतो. मेकअप करताना जसे आपण ब्रशचा सतत वापर करतो. तसेच मेकअप झाल्यानंतर त्या ब्रशची स्वच्छता ठेवणे देखील तितकेच महत्वाचे असते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की मेकअप केल्यानंतर ब्रशेस स्वच्छ न केल्यास त्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण खूप जास्त वाढते. हे बॅक्टेरियाचे प्रमाण एका  टॉयलेट सीटवर उपलब्ध असणाऱ्या बॅक्टेरियापेक्षा अधिक जास्त असते. कॉस्मेटिक टूल ब्रँड स्पेक्ट्रम कलेक्शनने (Cosmetic Tools Brand Spectrum Collection) केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, तुम्ही तुमचे मेकअप ब्रश कुठेही ठेवता, ते अस्वच्छ असल्यास, त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियाची संख्या आपल्याला आश्चर्यचकित करणारी असते. या संशोधनासाठी संशोधकांनी स्वच्छ आणि अस्वच्छ घाणेरडे मेकअपचे ब्रशेस घेतले. हे ब्रश बेडरुम, मेकअप बॅग, ड्रॉवर्स आणि ब्रश बॅग, बाथरुम अशा विविध स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले होते. जेव्हा या मेकअप ब्रशच्या नमुन्यांची तुलना टॉयलेट सीटच्या नमुन्यांशी केली गेली तेव्हा अस्वच्छ ब्रशेसवर बॅक्टेरियाचे प्रमाण टॉयलेट सीटपेक्षा जास्त होते. स्वच्छ मेकअप ब्रशमध्ये घाणेरड्या ब्रशपेक्षा कमी बॅक्टेरिया असल्याचे दिसून आले(Study Shows Makeup Brushes Hold More Bacteria Than a Toilet Seat).

हे बॅक्टेरिया तुमच्यावर कसा परिणाम करतात?

सौंदर्य प्रसाधन शास्त्रज्ञ कार्ली मिसलेह यांनी स्पेक्ट्रम कलेक्शनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मेकअप ब्रश चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, मृत त्वचा पेशी आणि तेल उत्पादने एका कडून दुसऱ्यांकडे स्थानांतरित करतात. याउलट सर्व प्रकारचे बॅक्टेरिया अपरिहार्यपणे हानिकारक असतातच असे नाही. पण जर तुम्ही दररोज घाणेरडा ब्रश वापरत असाल तर त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम होऊ शकतात किंवा त्वचेची समस्या वाढू शकते.

फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

मग अशा परिस्थितीत काय करावे?

जर तुम्हाला दररोज मेकअप ब्रशेस धुणे कठीण वाटत असेल तर तज्ज्ञ आठवड्यातून एकदा तरी ते स्वच्छ धुण्याचा सल्ला देतात. 

मेकअप ब्रश किंवा अ‍ॅप्लीकेटरनेच का करावा? ४ टिप्स, मेकअप चुकल्याने होणारे घोळ टळतील...

मेकअप ब्रशेस स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे?

१. मेकअप ब्रशेस स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सौम्य द्रव साबण वापरणे. साबणाचे २ ते ३ थेंब घ्यावे आणि त्यात थोडे पाणी घाला. आता ब्रशवर हे पाणी ओता आणि ब्रश धुवून घ्यावेत, त्यांच्यावर मेकअप प्रॉडक्ट्स राहणार नाही याची खात्री करा. स्वच्छ टॉवेलने पुसून टाका आणि नंतर कोरडे होईपर्यंत वाळू  द्या.

२. आठवड्यातून किमान एकदा मेकअप ब्रश धुवा. तसेच प्रत्येक वापरानंतर आयलाइनर आणि फाउंडेशन ब्रश धुवा. जर तुम्ही क्रिम उत्पादन वापरत असल्यास, प्रत्येक वापरानंतर ब्रश धुवा.

३. ब्रश नेहमी बंद बॉक्समध्येच ठेवा, जेणेकरून त्यावर धूळ आणि घाण साचणार नाही. ब्रश उघड्यावर ठेवू नका.

४. स्वच्छ ब्रश तुम्ही स्वच्छ झिपर पाऊचमध्ये ठेवू शकता. पण ते ड्रॉवरमध्ये उघडे ठेवू नका.

५. बेबी शॅम्पू ऐवजी सौम्य हँड वॉश किंवा क्लिंजिंग मिल्कचा वापर करू शकता. हँड वॉश सौम्य असेल तरच वापरा नाही तर चेहऱ्याला ॲलर्जी येण्याची शक्यता असते.

६. आठवडय़ातून एकदा किंवा दोनद ब्रश साफ करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे नुसतेच ब्रश चांगले राहत नाहीत तर बॅक्टेरियांपासूनही संरक्षण होते.

Web Title: Dirty Makeup Brushes Have More Bacteria Than A Toilet Seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.