Join us  

फक्त बाहेर जातानाच केस विंचरता-घरात बुचडा बांधून ठेवता? पाहा केस विंचरले नाही तर काय होतं..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 2:40 PM

Disadvantages of Not Combing Your Hair : अनेकजणी घराबाहेर पडताना केस विंचरतात कारण घरी असल्यावर त्यांना केस विंचरायला फार कंटाळा येतो.

आपले केस लांबसडक मोठे असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. केस चांगले ठेवण्यासाठी फक्त शॅम्पू आणि कंडीशनर वापरून चालत नाही तर तुम्हा केसांशी निगडीत प्रत्येक लहान-सहान गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. (What will happen if you don't comb your hair for weeks) अनेकजणी घराबाहेर पडताना केस विंचरतात कारण घरी असल्यावर त्यांना केस विंचरायला फार कंटाळा येतो. केसांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरातून कितीवेळा केस विंचरायला हवेत ते पाहूया. (Know the disadvantages of not combing your hair even once a day)

दिवसभरातून कितीवेळा केस विंचरावेत?

केस मजबूत राहण्यासाठी रोज २ वेळा केस विंचरणं गरजेचं आहे. केसात कंगवा वापरल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले  राहते. केस मजबूत होतात आणि केसांमध्ये गुंता होत नाही. दिवसभरातून कितीवेळा केस विंचरावेत हा अगदी सामान्य प्रश्न आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमीत कमी २ ते ३ वेळा केस विंचरायला हवेत.

सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी कंगव्याच्या साहाय्याने केस विंचरावेत. केसांच्या लांबीनुसार केस विंचरावेत. लांब केसांमध्ये गुंता खूप होतात म्हणून दिवसभरातून कमीत कमी ३ ते ४ वेळा केस विंचरायला हवेत. यामुळे केसांचे तुटणे आणि केस कमकुवत होणं कमी होतं.

केस पिकलेत-डायने केस पुन्हा पांढरे होण्याची भिती? १ चमचा कॉफीचा उपाय-केस होतील काळे

केस विंचरण्याचे फायदे 

केस विंचरल्याने केसांमध्ये जास्त गुंता होत नाहत आणि केस सुंदर दिसतात. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. कंगव्याने केसांतील मृत त्वचा निघून जाते आणि नवीन केस येात. यामुळे नैसर्गिकरित्या चांगले राहतात. नियमित केस विंचरल्याने केसांचं गळणं कमी होतं आणि केस वेगाने वाढतात. कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांना वॉल्यूम मिळते आणि केस दाट दिसून येतात.

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

केसांच्या टाईपनुसार कंगव्याची निवड कशी करावी?

१)  कुरळ्या केसांची काळजी करणं थोडं कठीण असतं.  कुरळे केस फार कोरडे पडतात. अशावेळी केस चांगले ठेवण्यासाठी तुम्ही नायलॉनच्या मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा.  यामुळे केस कमी तुटतील.

२) स्ट्रेट केसांची काळजी घेणं तुलनेनं सोपं असतं.  फ्लॅट पॅडल ब्रशने तुम्ही केस विंचरू सकता केसांवर जास्त जोर न देता  हळूवार केस विंचरा.

३) जर तुमचे केस जास्त दाट आणि वॉल्यूमिलस असतील तर जाड ब्रिसल्स असलेल्या कंगव्याचा वापर करा. यामुळे  केस गळत नाहीत आणि स्काल्पही चांगला राहतो. स्काल्पबरोबर हेअर ग्रोथही चांगली होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी