Join us

रात्री केस मोकळे ठेवून झोपावं की बांधून? जाणून घ्या, कोणत्या सवयीमुळे होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:13 IST

रात्री केसांची योग्य काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया...

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी फक्त चांगल्या शाम्पू आणि कंडिशनरने केस धुणे पुरेसं नाही. तर झोपतानाही केसांची योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपताना केस व्यवस्थित न ठेवल्यास केस जास्त कोरडे होऊ शकतात, केस तुटण्याचं प्रमाण वाढू शकतं, केस कुरळे होऊ शकतात आणि केसांच्या टेक्सचरवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत रात्री केस बांधून झोपावं की केस मोकळे ठेवणं चांगलं? असा प्रश्न हमखास पडतो. रात्री केसांची योग्य काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया...

रात्री केस हलके बांधून तुम्ही झोपू शकता. जर तुम्ही केस घट्ट बांधून झोपलात तर ते केस मुळांपासून ओढले जातात आणि केसांना नुकसान पोहोचवतं. याशिवाय जर तुम्ही मोकळे केस ठेवून झोपलात तर रात्री जेव्हाही तुम्ही झोपेत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळाल तेव्हा केसांचं नुकसान होईल. म्हणूनच रात्री झोपताना केसांची खूप हलकी आणि सैल वेणी घालता येते. वेणीला रबर बँडऐवजी सैल सॅटिन स्क्रंची वापरून पाहा. स्क्रंची वापरल्याने केस ओढले जात नाहीत आणि तुटत नाहीत.

ओल्या केसांनी झोपू नका

जर तुम्हाला रात्री केस धुण्याची सवय असेल तर लक्षात ठेवा की, ओल्या केसांनी झोपू नये. ओले केस तुटण्याची शक्यता जास्त असते. ओले केस देखील कमकुवत असतात आणि त्यामुळे ते अधिक खराब होतात. केस पूर्णपणे सुकवल्यानंतरच झोपणं चांगलं.

सॅटिन पिलो कव्हर

झोपताना केसांचा गुंता होऊ नये म्हणून सॅटिन किंवा सिल्कचे उशीचे कव्हर वापरले जाऊ शकतात. या प्रकारच्या उशांचे कव्हर केसांना इजा करत नाहीत. लक्षात ठेवा की, काही दिवसांनी तुमच्या उशीचं कव्हर बदलत राहिलं पाहिजे.

केसाला स्कार्फ बांधा

जर तुमचे केस कुरळे असतील आणि तुम्ही केस धुतल्यानंतर केसांची हेअर स्टाईल केली असेल तर केसांचं नुकसान होऊ शकतं. केसांचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करता येतो. डोक्यावर स्कार्फ बांधू शकता म्हणजे केस खराब होणार नाहीत.

केसांना सीरम लावू शकता

झोपताना केसांना सीरम लावल्याने केस खराब होत नाहीत. सीरम केसांना मुलायम बनवतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केसांचा गुंता होत नाही. 

टॅग्स :केसांची काळजी