Join us  

सणासुदीला चेहरा उजळ दिसण्यासाठी काय करायचं? गोल्ड फेशियलच्या ३ स्टेप्स-टॅनिंग पूर्ण निघेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:23 PM

How to do Gold Fecial at Home : (Gharchya ghari facial in marathi) : दिवाळीत  गोल्ड फेशियल करण्यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची काही गरज नाही.

दिवाळीच्या दिवसांत आपण ग्लोईंग दिसावं असं प्रत्येकालाच वाटते. यासाठी तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो  करू शकता. स्किन फेशियल त्वचेचसाठी फायदेशीर ठरते. (Ghari Gold Facial Kas Karaych) महिन्यातून एकदा फेशियल करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा घरी फेशियल करायला पुरेसा वेळ मिळत नाही अशावेळी तुम्ही काही सोपे उपाय करून त्वचेवर ग्लो मिळवू शकता. (Tips to Use Gold Facial Kit the Right Way)

दिवाळीत  गोल्ड फेशियल करण्यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची काही गरज नाही. (Gharchya ghari facial kase karave) काही सोप्या स्टेप्सनी तुम्ही घरीच पार्लरसारखा ग्लो मिळवू सकता. गोल्ड फेशियलने चेहऱ्यावर तेज येईल आणि चेहरा चमकदार दिसेल. गोल्ड फेशियल करण्याची  सोपी पद्धत पाहूया. (How to do gold facial at home step by step)

1) फेस क्लिंज करून घ्या

गोल्ड फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी फेस क्लिंज करणं फार महत्वाचे असते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला कच्च दूध लागेल. कच्च्या दूधाने त्वचा क्लिंज होण्यास मदत होते.  फेस क्लिंज करण्यासाठी थंड दूधात कापूस बुडवा. नंतर कापूस आपल्या चेहऱ्यावर रब करून  ५ मिनिटांनी टिश्यू पेपर किंवा ओल्या रुमालाने चेहरा पुसून घ्या.

चेहऱ्यावर अजिबात तेज नाहीये? शहनाज हुसैनने सांगितला खास उपाय करा-सुंदर दिसेल चेहरा

2) चेहऱ्यावर स्क्रब

फेशियलची दुसरी स्टेप म्हणजे चेहऱ्यावर स्क्रब करणं. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जाण्यास मदत होते. यामुळे चेहरा चमकदार दिसतो.  हे स्क्रब करण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये १ चमचा साखर, १ चमचा लिंबाचा रस आणि दीड चमचा मध मिसळा.  हे सर्व पदार्थ एकजीव करून त्याच स्क्रब तयार करून घ्या. स्क्रब पाण्यात मिसळून त्वचेवर लावा. त्वचा कमीत कमी २ मिनिटांपर्यंत रब करून चेहऱ्यावर लावा.

3) फेस मसाज कशी करावी?

मसाज केल्याने चेहरा रिलॅक्स राहण्यास मदत होते. फेस मसाज करताना घरगुती क्रिमचा वापर करू शकाता. बाजारातून मिळणारे क्रिम्स विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी क्रिम तयार करू शकता. एका बाऊललमध्ये २ चमचे एलोवेरा जेल आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून घ्या. त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून एकजीव करा. तयार आहे फेस मसाज क्रिम संपूर्ण चेहऱ्याला डॉट्सच्या स्वरूपात ही क्रिम लावा. नंतर फिंगरटिप्सच्या मदतीने चेहऱ्यावर जवळपास ५ ते ७ मिनिटं मसाज करा. नंतर स्किन सॉफ्ट टिश्यू पेपरनं पुसून घ्या. 

फेस मास्कचा उपयोग कसा करावा?

फेस मास्क स्किन केअर रूटीनचा एक  महत्वाचा भाग आहे. हा फेस मास्क लावून चेहऱ्याला अनेक प्रकारे फायदा मिळेल. फेस मास्क त्वचेचला हायड्रेट ठेवण्यास  मदत करतात. फेस  मास्क बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स  फॉलो करू शकता.  अर्धा चमचा हळदीत २ चमचे बेसन घाला. त्यात २ चमचे दूध, १ चमचा गुलाब जल आणि १ चमचा मध घाला हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. तयार आहे फेस मास्क. या फेसमास्कचा वापर तुम्ही चेहरा आणि मानेवर  करू शकता. २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.  

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी