Join us  

चेहऱ्यावर अजिबात तेज नाहीये? शहनाज हुसैनने सांगितला खास उपाय करा-सुंदर दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 10:33 AM

Diwali Beauty Tips (chehryavar tej yenyasathi upay) : नेहमी नेहमी पार्लरला पैसे घालवणं अनेकांना पटत नाही. घरच्याघरी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट्ससारखा ग्लो मिळवण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी खास टिप्स शेअर केल्या आहेत

दिवाळी हा सण सुरू होण्याच्या महिनाभर आधीपासूनच लोक हा सण साजरा करण्याची तयारी करतात. खासकरून महिलांना  दिवाळीत बरीच कामं असतात. (Skincare For Diwali) ही कामं पूर्ण करता करता कधी कधी इतका थकवा येतो की स्वत:कडे लक्ष द्यायला जराही वेळ मिळत नाही. (Chehryavar glow yenyasathi upay) अशात चेहऱ्यावरची सर्व चमक निघून जाते आणि चेहरा डल दिसतो. नेहमी नेहमी पार्लरला पैसे घालवणं अनेकांना पटत नाही. घरच्याघरी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट्ससारखा ग्लो मिळवण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी खास टिप्स शेअर केल्या आहेत. (How to get that perfect Diwali glow by Beauty Expert Shahnaz Hussain)

दिवाळीला आपला चेहरा चमकदार दिसावा आपण थकल्यासारखे दिसू नये असं प्रत्येकालाच वाटतं. पण कितीही केलं तरी चेहऱ्यावरचा थकवा लपवता येत नाही. यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. दिवाळीच्या १ दिवस आधीचे ब्युटी रूटीन कसं ठेवावे जेणेकरून चेहऱ्यावर ग्लो येईल ते पाहूया. (Easy Skin Care Tips for Glowing Skin on Diwali)

टोनर लावा

गुलाबपाणी एक नैसर्गिक टोनर आहे. तुम्ही आपल्या स्किन टाईपनुसार टोनरची निवड करू शकता. ग्रीन टी पासून तयार झालेला टोनरसुद्धा कमालीचा रिजल्ट देतो. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. घरच्याघरी हे टोनर बनवणं सोपं आहे.  १ कप ग्रीन  टी च्या पाण्यात एक व्हिटामीन ई कॅप्सूल घालून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आणि चेहऱ्यावर स्प्रे  करा. नंतर कॉटनच्या कापडाने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.  

चेहरा स्क्रब करा

आजकाल बाजारात बरीच फळं दिसून येतात. केळी, किव्ही, पपई किंवा संत्री तुम्हाला बाजारात लगेचच मिळतील. या फळांच्या मदतीने स्क्रब तयार करणं खूपच सोपं आहे. पपई, केळी, संत्री आणि किव्हीचे साल तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता किंवा पावडर  बनवून दूध आणि दह्याबरोबर एकजीव करून हे स्क्रब तयार करा.

फेस मास्क

स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याववर फेस मास्क लावायला विसरू नका. कारण स्क्रब केल्यानं चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात आणि ते बंद न झाल्यामुळे चेहऱ्यावर घाण जमा होते यामुळे पिंपल्स येऊ शकतात. घरच्याघरी फेस मास्क बनवण्यासाठी ओट्स पावडर, १ चमचा बदाम पावडर आणि २ मोठे चमचे संत्र्याचा रस घ्या. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून  फेसपॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावून ३० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

या गोष्टींची काळजी घ्या

१) चेहऱ्यावर थकवा येणार नाही यासाठी चांगली झोप घेणं गरजेचे  असते. झोपेमुळे चेहऱ्यावर एक अनोखी चमक येते.

२) दिवाळीच्या १ दिवस आधी फेशियल करणं टाळा. यामुळे चेहऱ्यावर दाणे येऊ शकतात. ही समस्या एक-दोन दिवसांत ठिक होणाारी नाही.

३) चेहऱ्यावर जर ब्लॅकहेड्स येत असतील तर दिवाळीच्या एक दिवस आधी ते काढून नका. अनेकदा ब्लॅकहेड्स काढणं कठीण होतं. ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो.

वजन वाढलंय, जीमला जाणं जमत नाही? घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल

४) कोणत्याही नवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करू नका. कारण त्वचेला नवीन प्रोडक्ट सुट झालं नाही तर त्वचेवर रिएक्शन येण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाचे असे की त्वचा मॉईश्चराईज करा. या व्यतिरिक्त आपल्या स्किन टाईपनुसार मॉईश्चरायजरची निवड करा.

५) चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. जर त्वचा हायड्रेट असेल तर त्वचेवर आपोआप चमक येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी