Lokmat Sakhi >Beauty > ऐन दिवाळीत डोक्यावरचे केस फारच पांढरे दिसतात? १ घरगुती उपाय, १० मिनिटांत केस होतील काळेभोर

ऐन दिवाळीत डोक्यावरचे केस फारच पांढरे दिसतात? १ घरगुती उपाय, १० मिनिटांत केस होतील काळेभोर

Diwali Hair Care Tips : आजकालच्या काळात केस पांढरे झाल्यामुळे अनेकांजण तणावाखाली असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:57 AM2024-10-29T11:57:54+5:302024-10-29T15:05:31+5:30

Diwali Hair Care Tips : आजकालच्या काळात केस पांढरे झाल्यामुळे अनेकांजण तणावाखाली असतात.

Diwali Hair Care Tips : How To Turn Grey Hairs Into Black Hairs Using Home Remedies | ऐन दिवाळीत डोक्यावरचे केस फारच पांढरे दिसतात? १ घरगुती उपाय, १० मिनिटांत केस होतील काळेभोर

ऐन दिवाळीत डोक्यावरचे केस फारच पांढरे दिसतात? १ घरगुती उपाय, १० मिनिटांत केस होतील काळेभोर

सणासुधीला केस काळेभोर, सुंदर दिसावेत (Diwali) असं प्रत्येकालाच वाटतं. केस पांढरे होणं वाढत्या वयाचं लक्षणं आहे (Hair Care Tips). आजकालच्या काळात केस पांढरे झाल्यामुळे अनेकजण तणावाखाली असतात. केस पांढरे होऊ नये यासाठी महागडे केमिकल्सही वापरले जातात. केस काळे करण्यासाठी लोक बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर  करत आहेत. (How To Turn Grey Hairs Into Black Hairs Using Home Remedies)

यातील केमिकल्समुळे केस वेळेआधीच  डॅमेज होतात. याशिवाय केस लवकर तुटतात आणि पांढरे केस पुन्हा पुन्हा येतात. केसांना काळे आणि दाट बनवण्यासाठी तुम्ही काही घरगुती  उपाय करू शकता. ज्यामुळे केसांचे आरोग्यही चांगले राहते. हे घरगुती उपाय कोणते आहेत ते समजून घेऊ. (Grey Hairs Solution)

1) आवळा

केस काळे करण्यासाठी आवळा एक उत्तम पर्याय आहे यात व्हिटामीन सी असते. याचे सेवन केल्यास केस काळेभोर राहण्यास मदत होते.  याव्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं याचा वापर करू शकता. आवळ्याची पावडर  केसांना नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यास मदत करते. यासाठी 2 चमचे आवळ्याची पावडर,  2 चमचे लिंबाच रस एकत्र मिसळा. दोघांमध्ये अर्धा लिटर पाणी मिसळा. नंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.

2) नारळाचं तेल

केसांना काळं करण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता. यासाठी केसांची रोज नारळाच्या तेलानं मसाज करा. रात्री या तेलानं मसाज करा आणि केस धुवून टाका असं केल्यानं केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास  मदत होईल.

जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

3) कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांसाठी फायदेशीर ठरतो. यातील तत्व केसांना काळे ठेवण्यास  मदत करतात. केसांना मऊ, मुलायम बनवण्याासठी तुम्ही कांद्याचा रस काढून मिक्सरमध्ये वाटू शकता. नंतर कांद्याचा रस मुळांना लावून  सुकू द्या, सुकल्यानंतर केस  धुवून  घ्या.

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

केसांना त्वरीत काळे कसे करावे?

जर तुम्ही केसांना त्वरीत काळे करू इच्छित असाल तर पाण्यत चहा पावडर उकळू द्या. दहा मिनिटं चहा उकळल्यानंतर  पाणी मेहेंदीत मिसळून केसांना लावा, ज्यामुळे  केसांचा रंग लगेचच काळाभोर होईल.

Web Title: Diwali Hair Care Tips : How To Turn Grey Hairs Into Black Hairs Using Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.