Join us

दिवाळी तर झाली, आता त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा हे ६ मस्त उपाय! त्वचेला घेऊ द्या मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 16:51 IST

सणावारानंतर शरीर आणि त्वचा डिटॉक्स करणे गरेजेचे असते. यासाठी कोणते घरगुती उपाय करायला हवेत हे जाणून घेऊया...

ठळक मुद्देकेमिकल असलेल्या क्लिन्झरपेक्षा नैसर्गिक क्लिन्झर केव्हाही चांगले नितळ त्वचेसाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय जाणून घ्या

दिवाळी म्हटली की थोडे थंड वातावरण, त्यातच बाहेर जायचे असल्याने ४ दिवस चेहऱ्याला केलेला मेकअप. आता तुम्ही म्हणाल, दिवाळीसारख्या मोठ्या सणाला मेकअप तर हवाच ना. पण मेकअप केल्यानंतर घरी आल्यावर तो साफ करणेही तितकेच महत्त्वाचे असून हा मेकअप चेहऱ्यावर तसाच राहीला तर आपल्याला त्याचा निश्चितच त्रास होऊ शकतो. आता हा मेकअप काढण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर मिळतात. पण यातही केमिकलचा वापर केलला असल्याने हे क्लिन्झर त्वचेसाठी म्हणावे तितके चांगले नसतात. 

आपण बाहेरुन त्वचेला जे लावतो त्यापेक्षा आपण जे खातो त्यामुळे आपली त्वचा, डोळे, केस चांगले दिसण्यास मदत होते, त्यामुळे तुमचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे. आहारातून शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व, खनिजे आणि पोषक घटक मिळणे आवश्यक आहे. पाहूयात आहारातील असे घटक जे त्वचेसाठी क्लिन्झर म्हणूनही अतिशय उपयुक्त असतात. पाहूयात असेच काही नैसर्गिक क्लिन्झर...

सोपे आणि घरगुती उपाय...

१.  गार दुधामध्ये लॅक्टीक अॅसिड जास्त प्रमाणात असते, त्याचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयोग होतो. त्याचवेळी यातील सुदनिंग घटक त्वचेसाठी उत्तम क्लिन्झर म्हणून काम करतो. 

२. दह्यामध्येही लॅक्टीक अॅसिड आणि नॅचरल अल्फा हायड्रॉक्सि अॅसिड असते. यातील घटकही त्वचेच्या सूदनिंगसाठी आणि क्लिन्झिंगसाठी अतिशय उपयुक्त असतात. 

३. लाल भोपळ्यामध्येही बऱ्याच प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. यातील अ आणि क व्हीटॅमिन तसेच झिंक या घटकांमुळे त्वचेचे मॉइश्चरायझिंग होण्यास मदत होते. यातील अल्फा हायड्रोक्सि अॅक्शन आणि बेटा केरेटीन अँटी ऑक्सिडंटस त्वचेचे पोषण करतात. 

४. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यानेही शरीर आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे सणावारांच्या दिवसांत वेगवेगळे खाल्ले गेल्यास जास्त प्रमाात पाणी प्यायला हवे. पाणी कमी पडल्यास किडणी आणि यकृताचे काम योग्य प्रमाणात होत नाही. 

५. अल्कोहोल, कॉफी यांसारख्या गोष्टींचे सेवन शक्यतो करुच नये, केले तरी योग्य प्रमाणात करावे. अन्यथा त्याचे शरीरावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात. 

शरीर आणि त्वचेसाठी आवश्यक घटक 

१. लोह - शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने लोहाची आवश्यकता असते. लोहाची पातळी कमी असेल तर केस गळण्याची आणि डार्क सर्कलची समस्या उद्भवते. यासाठी आहारात पालक, सोयाबिन, राजमा, अंडी, सगळी धान्ये यांचा समावेश असायला हवा. 

२. झिंक - शरीरात झिंकची कमतरता असेल तर चेहऱ्यावर डाग, फोड येतात. तसेच झिंकच्या कमतरतेमुळे नखे आणि केस कमी होतात. सर्व प्रकारच्या बिया आणि दुध आणि दुग्धजन्य पदार्थांतून शरीराला झिंक मिळते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीदिवाळी 2021